
Pune, 20 June : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘माझ्या मर्जीतील उमेदवार निवडून द्यायचं नाही, म्हटलं तर मी काय करू शकतो, हे पुरंदर आणि शिरूरमध्ये तुम्ही बघितलं आहे’ असे विधान केले आहे. अजित पवारांनी जुनी खपली काढताच आमदार विजय शिवतारेंनी जोरदार पलटवार केला आहे. ‘अरे निवडून आणलं ते सांग ना. पाडलं म्हणून काय सांगतो. गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांवर टीका केली.
विजय शिवतारे म्हणाले, अजित पवार (Ajit Pawar) हे काय बोलले होते, तो आता इतिहास झालेला आहे. पण, सध्या वस्तुस्थिती काय आहे, हे महाराष्ट्राला माहिती झालं पाहिजे. महायुती असतानाही अजित पवार यांनी विश्वासघात करून माझ्या विरोधात त्यांचा उमेदवार उभा केला. पण त्या उमेदवाराला 47 हजार मतं मिळाली, तर मला एक लाख 28 हजार मतं मिळाली आहेत. म्हणजे अजित पवारांच्या उमेदवाराला 78 हजार मतांनी चितपट करून मी निवडून आलो आहे, हे त्यांनी महाराष्ट्राला सांगावं ना.
तुम्ही एकवेळ लोकांना फसवू शकता, अनेका वेळा तुम्ही लोकांना फसवू शकत नाही. त्यांनी तो पुनरुच्चार करायला नको, तरीही मी माफ केलं. लोकसभा निवडणुकीच्या वेळी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचं ऐकून मी माघार घेतली. नाही तर काय झालं असतं हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. मैत्री ही पक्या शब्दांची असावी. पण अजित पवार हे ठेवत नाहीत. त्यांची विश्वासर्हता शून्य आहे, असा दावा विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) केला.
शिवतारे म्हणाले, आताही माझी त्यांना विनंती आहे की, एकमेकांच्या विरोधात काही तरी बोलत राहून नकारात्मक गोष्टी करण्याऐवजी एकत्र येऊन सकारात्मक काम केलं पाहिजे. उगाच मोठेपणा दाखवायचा. मी ह्याला पाडलं, मी त्याला पाडलं. अरे निवडून आणलं ते सांग ना. पाडलं म्हणून काय सांगतो. गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो. गाव घडवायला अनेक हात लागतात.
तारतम्य सुटत चाललंय
या वेळी त्यांनी ज्यांना ज्यांना धमक्या दिल्या, त्या खऱ्या झाल्या का? बजरंग सोनावणेंना पाडतो, अमोल कोल्हेंना पाडतो. नीलेश लंकेंना पाडतो, झालं का तसं? आपली विश्वासर्हता कमी होत आहे, याचा आता अजित पवारांनी विचार केला पाहिजे. माझ्याबाबत वक्तव्य केलं, मी गप्प होतो. पण, चंद्रराव तावरेंबाबत केलेले विधान चुकीचे आहे, कुठंतरी त्यांचं तारतम्य सुटत चाललंय आहे. कधी कधी ते इतक्या प्रचंड खालच्या स्तरावर बोलतात, असा आरोपही शिवतारेंनी केला.
अजित पवारांनी मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न सोडून द्यावं
अजित पवारांना अहंकार प्रचंड झाला आहे. माळेगाव कारखाना माझ्याइतका चांगला चालविणारा दुसरा कोणी नाही, असं ते सांगत आहेत. आता लोकं बोलायला लागले आहेत, काटेवाडीत सरपंच होण्यासाठी त्यांच्याइतका चांगला उमेदवार होऊच शकत नाही. त्यामुळे अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न सोडून द्यावं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.