Solapur Lok Sabha : भाजपच्या ‘त्रिमूर्ती’वर राम सातपुतेंच्या विजयाची भिस्त....

Solapur BJP News : सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे पाच आमदार असले तरी राम सातपुते यांना निवडून आणण्याची मुख्य जबाबदारी आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर असणार आहे.
Subhash Deshmukh-Sachin kalyanshetti-Vijaykumar Deshmukh-Ram Satpute
Subhash Deshmukh-Sachin kalyanshetti-Vijaykumar Deshmukh-Ram SatputeSarkarnama

Solapur, 07 April : सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यामध्ये लढत होत आहे. सातपुते यांच्या पाठीशी मतदारसंघातील महायुतीच्या पाच आमदारांचे पाठबळ असणार आहे. मात्र, आमदार विजयकुमार देशमुख, माजी मंत्री सुभाष देशमुख आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी या भाजपच्या 'त्रिमूर्ती'वरच सातपुते यांच्या विजयाची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणे दोन्ही देशमुख आणि कल्याणशेट्टी पुन्हा भाजप उमेदवार राम सातपुते यांना लीड देणार का?, हा खरा प्रश्न आहे.

महायुतीचे पाच आमदार सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok Sabha Constituency) येतात. त्यामुळे सातपुते यांची बाजू भक्कम वाटते. मात्र, ग्राउंड रियालिटी वेगळी आहे. सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी, विमानतळ, पाणीप्रश्न, कांदा आणि इतर शेतीमालाचे बाजारभाव असे प्रश्न सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणणारे ठरू शकतात. विशेषतः मंगळवेढ्यातील पाणी प्रश्नावर सत्ताधारी मंडळी बॅकफूटर गेल्याचे दिसून येते. त्या ठिकाणी प्रणिती शिंदे यांनी चांगलाच जोर लावला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Subhash Deshmukh-Sachin kalyanshetti-Vijaykumar Deshmukh-Ram Satpute
Jayant Patil on Khadse : खडसेंच्या भाजप प्रवेशामागचे जयंत पाटलांनी सांगितले कारण....

दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे पाच आमदार असले तरी राम सातपुते (Ram Satpute) यांना निवडून आणण्याची मुख्य जबाबदारी आमदार विजयकुमार देशमुख (VijayKumar Desmukh), सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) आणि सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांच्यावर असणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत विजयकुमार देशमुख यांच्या सोलापूर शहर उत्तरने सर्वाधिक ६३ हजार ६६७ चे मताधिक्य दिले. आमदार प्रणिती शिंदे प्रतिनिधीत्व करत असलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून ३० हजार ८२९ एवढे लीड दिले होते.

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून भाजपला ४७ हजार ४२९ मते मिळाली होती. माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूर मतदारसंघातून ३७ हजार ७७८ मताधिक्य होते. मागील निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना केवळ मोहोळ आणि पंढरपूर-मंगळवेढा या दोन मतदारसंघातूनच मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे आताही सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राम सातपुते यांना निवडणून आणण्याची जबाबदारी ही दोन देशमुख आणि कल्याणशेट्टी यांच्याच खांद्यावर असणार आहे.

Subhash Deshmukh-Sachin kalyanshetti-Vijaykumar Deshmukh-Ram Satpute
Mohite Patil News : रणजितसिंह मोहिते पाटलांचे मन भाजपतून अजूनही निघेना...सशक्त भाजप म्हणत दिल्या शुभेच्छा!

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामी यांना अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि सोलापूर शहर उत्तर या तीन विधानसभा मतदारसंघातून १ लाख ४८ हजार ८७४ एवढे मताधिक्क्य दिले होते. आताही या तीन आमदारांवरच सातपुते यांच्या विजयाची भिस्त असणार आहे. मोहोळ आणि पंढरपूरमधून सुशीलकुमार शिंदे यांना लीड मिळाले होते.

एमआयएमच्या उमेदवाराची प्रतीक्षा

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, भाजप, वंचित आणि यशवंत सेनेने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, यात मुख्य लढत ही शिंदे विरोध सातपुते अशीच होणार आहे. वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला आहे. मात्र, तो तेवढा सक्षम वाटत नाही. त्यामुळे सोलापूरमध्ये आता एमआयएमच्या उमेदवारीची प्रतीक्षा आहे. एमआयएमकडून माजी आमदार रमेश कदम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, कदम उमेदवार असतील तर त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Subhash Deshmukh-Sachin kalyanshetti-Vijaykumar Deshmukh-Ram Satpute
Solapur Lok Sabha Constituency : भाजपला धक्का; फडणवीसांचे निकटवर्तीय संजय क्षीरसागरांना यशवंत सेनेची उमेदवारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com