Jayant Patil on Khadse : खडसेंच्या भाजप प्रवेशामागचे जयंत पाटलांनी सांगितले कारण....

Eknath Khadse Join BJP : एकनाथ खडसे हे गेली काही महिने प्रचंड दबावाखाली वावर आहेत. भाजपमध्ये जाण्यासंदर्भात खडसेंसोबत माझं काही बोलणं झालेलं नाही. पण, त्यांच्याभोवती प्रचंड अडचणी तयार करण्यात आलेल्या होत्या.
Jayant Patil-Eknath Khadse
Jayant Patil-Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 07 April : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे हे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. भाजप प्रवेशावर खुद्द खडसे यांनीच भाष्य केले आहे. येत्या ९ एप्रिल रोजी ते घरवापसी करणार आहेत. त्याबाबत उलटसुटल चर्चा होताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसेंच्या भाजप प्रवेशामागचे कारण सांगितले आहे.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे येत्या मंगळवारी (ता. 09 एप्रिल) भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत चंद्रपूरमध्ये हा पक्ष प्रवेशाचा सोहळा होणार असल्याची माहिती आहे. तसेच, भाजपकडून खडसेंवर राज्यपाल पदाची जबाबदारी देणार असल्याचे वृत्त आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jayant Patil-Eknath Khadse
Mohite Patil News : रणजितसिंह मोहिते पाटलांचे मन भाजपतून अजूनही निघेना...सशक्त भाजप म्हणत दिल्या शुभेच्छा!

खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षात जाणार आहेत, याची मला अजून माहिती नाही. त्यांना बऱ्याच अडचणी तयार करण्यात आल्या होत्या. एकनाथ खडसे हे गेली काही महिने प्रचंड दबावाखाली वावर आहेत. भाजपमध्ये जाण्यासंदर्भात खडसेंसोबत माझं काही बोलणं झालेलं नाही. पण, त्यांच्याभोवती प्रचंड अडचणी तयार करण्यात आलेल्या होत्या.

भाजपने खडसेंवर जे आरोप केले होते, ते धुण्यासाठी आता वेगळी वाशिंग मशिन आली आहे का. पक्षांतर्गत लोकांनी केलेले आरोप धुवून काढण्यासाठी कोणत्या वॉशिंग मशिनचा वापर करण्यात येणार आहे. खडसेंनी फडणवीसांवर अत्यंत गंभीर आरोप केले होते. लोकांना हळूहळू या गोष्टीचं स्मरण होईल, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला.

Jayant Patil-Eknath Khadse
Eknath Khadse On Sharad Pawar : मी शरद पवारांचा कायम ऋणी; स्वगृही परतणारे नाथाभाऊ भावूक...

भारतीय जनता पक्षातील वाद देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे लीलया सोडवतात, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपमध्ये एकनाथ खडसेंचा छळ झाला आहे, त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार नाहीत. कारण ते स्वाभिमानी नेते आहेत, असं म्हटलं होतं.

एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला कोणाचाही विरोध नाही. देवेंद्र फडणवीस यांचाही विरोध नाही. उलट फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांना नेहमी मानाचे स्थान दिले आहे. खडसे आमचे नेते होते, त्या काळातही त्यांनी फडणवीस यांना सहकार्य केलेले आहे. आमची केंद्रीय आणि राज्य समिती हे भाजप प्रवेशाचे निर्णय करते, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Jayant Patil-Eknath Khadse
Eknath Khadse News : स्वगृही परतण्यासाठी नाथाभाऊंना भाजपने घातल्या अटी; आमदारकी अन्...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com