Vijaykumar Deshmukh : डीपीसीच्या बैठकीला दांडी मारणाऱ्या देशमुखांची शिंदेसेनेच्या मंत्र्याच्या दौऱ्यात हजेरी

Uday Samant Solapur Tour : सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस आमदार विजयकुमार देशमुख अनुपस्थित राहिले. त्याचवेळी त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत खासगी कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याने राजकीय चर्चांना उधाण आले.
Vijaykumar Deshmukh
Vijaykumar DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 13 July : सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बहुचर्चित बैठक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या सभेला जिल्ह्यातील बहुतांश आमदार आणि खासदार उपस्थित होते. मात्र, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ आमदार विजयकुमार देशमुखांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. नियोजन समितीच्या बैठकीला दांडी मारणाऱ्या देशमुखांनी शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत एका खासगी कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे पुढे येत आहे, त्यामुळे देशमुखांची नाराजी अजून गेली नाही का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आपापल्या मतदारसंघासाठी निधी खेचून नेण्याची स्पर्धा लागलेली असते. नेमके त्याच बैठकीकडे माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांनी पाठ का फिरवली, असा सवाल उपस्थित होत आहे.

दोन्ही देशमुखांची पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील नाराजी लपून राहिलेली नाही. असे असतानाही माजी सहकार मंत्री तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी बैठकीला हजेरी लावून आपल्या खास शैलीत बॅटिंग केली. विशेषतः आम्ही सांगितले की राग येतो, मुख्यमंत्र्यांपर्यंत बोलूनही प्रश्न मार्गी लागला नाही, अशी नाराजी बोलून दाखवली.

Vijaykumar Deshmukh
Baba Farzan : खैरेंच्या विरोधात विधानसभा लढलेल्या डाॅन बाबा फर्जनबद्दल दोन्ही शिवसेनेला एवढी सहानुभूती का?

एकीकडे सुभाष देशमुख यांनी आपली नाराजी बाजूला ठेवन नियोजन समितीच्या बैठकीला हजेरी लावली. पण विजयकुमार देशमुख यांनी मात्र बैठकीकडे पाठ फिरविणे पसंत केले. ते शेवटपर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकडे फिरकलेच नाहीत.

Vijaykumar Deshmukh
Kalyanshetti Vs Mhetre : कल्याणशेट्टी-म्हेत्रे वाद वाढला : नव्या कोऱ्या 5 एसटी बस...अवघ्या तासाभरात दोनदा लोकार्पण!

जिल्हा नियोजन समितीकडे पाठ फिरविणारे आमदार विजयकुमार देशमुख यांनी शिवसेनेचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत एका कार्यक्रमात दिसून आले. शिंदेसेनेचे मंत्री आल्यानंतर देशमुख गटाचे नगरसेवक त्यांच्या स्वागताला हजर असतात, त्यामुळे आमदार देशमुख यांची डीपीसीतील अनुपस्थिती आणि होटगी मठात सामंत यांच्यासोबत लावलेली हजेरी याची चर्चा सोलापूर शहरात रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com