Vilasrao Jagtap News : विलासराव जगतापांचा भाजपला घरचा आहेर ; पाण्यासाठी सर्वपक्षीयांनी दिला 'हा' इशारा...

Water supply issues : म्हैसाळ आणि टेंभू योजनेचे निविदा काढून काम सुरू करण्याची मागणी.
Vilasrao Jagtap
Vilasrao JagtapSarkarnama
Published on
Updated on

Sangli Political : म्हैसाळ विस्तार योजनेमध्ये वंचित असलेल्या 65 गावांसाठी लवकरात लवकर निविदा काढून काम सुरू करावे. त्याचबरोबर टेंभू योजनेमध्ये समावेश असलेल्या चार गावांची पाणी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी जत तालुक्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. पाणी प्रश्नावर नेत्यांनी एकत्रित येत सत्ताधारी भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

सत्ताधारी भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत, राष्ट्रवादीचे सुरेश शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी एकत्र येत भाजप विरोधात मोर्चा काढला आहे. तर 19 फेब्रुवारीला शिवजयंती दिवशी जत तालुक्यात सर्वत्र चक्काजाम करण्याचा इशारा माजी आमदार जगताप यांनी देत भाजपला घरचा आहेर दिला. पाणी प्रश्नावर नेत्यांनी एकत्रित येत सत्ताधारी भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

Vilasrao Jagtap
Ganpat Gaikwad Firing : आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणी वाढल्या; अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा...

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मन्सूर खतीब, जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील, ॲड. प्रभाकर जाधव, विक्रम ढोणे, ॲड. युवराज निकम, परशुराम मोरे, अविनाश वाघमारे, प्रकाश होनमाने, भाजप तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत, शिवाजी शिंदे, शंकर वगरे, संग्राम जगताप, दिनकर पतंगे, ॲड. श्रीपाद अष्टेकर, रवींद्र सावंत, मंगेश सावंत, बंडू डोंबाळे, साहेबराव टोणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी माजी आमदार जगताप म्हणाले, शासनाला जाग आली नसेल तर सर्वांनी एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे. आता आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यानंतर तालुकास्तरावर रास्तारोको करण्यात येणार असून जर शासन त्यातूनही जागे झाले नाही तर तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर निवडणुकीवर बहिष्कार घालू, असेही जगताप यांनी सांगितले.

जत तालुक्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. 37 गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. असे असताना शासनाला अजूनही जाग आली नाही. छोट्या छोट्या गावात जे आंदोलन सुरू आहे, ते चुकीचे असून सर्वांनी एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे. नियमबाह्य खर्च करून तालुक्याला पाणी मिळणार नाही.

आंदोलनाच्या तिसऱ्या, चौथ्या टप्प्यात मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात येणार आहे. म्हैसाळ विस्तारित योजनेमधील 65 गावांसाठी टेंडर, त्याचबरोबर चार गावांचा टेंभू योजनेमध्ये समाविष्ट करून त्याच्या निविदा त्वरित काढण्यात याव्यात. आता जनतेचा अंत पाहू नका, असे त्यांनी सांगितले.

जत तालुक्यात पाणी आले तर जत तालुका जिल्ह्याला ओव्हरटेक करू शकेल. यासाठी आता आरपारची लढाई असल्याचे माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले, मतभेद विसरून सर्वांनी एकत्र या, मी कोणाच्याही हाताखाली काम करण्यास तयार आहे. फक्त पाणी या तालुक्याला मिळणे गरजेचे असल्याचे माजी आमदार जगताप यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

Vilasrao Jagtap
Shambhuraj Desai News : नेत्याच्या मुलाला शुभेच्छा द्यायला की गायकवाडांची विचारपूस करायला ठाण्यात?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com