
Solapur, 26 June : बीजेपी म्हणजे ‘दो दिन की चांदणी’ आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये काहीही ताळमेळ नाही. ते एकमेकांना खेचत आहेत. देवेंद्र फडणवीस त्यांना ‘पीए’सुद्धा नेमू देत नाहीत. कार्यक्रमात त्यांची नावं नसतात, स्टेजवर बसायला जागा देत नाहीत, त्यामुळे लवकरच त्या तिघांच्या महायुतीमध्ये बिघाडी होणार आहे, ती तुटणार आहेत, असा दावा काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला.
अक्कलकोट येथील काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडले. प्रणिती शिंदे (Praniti Shinde) म्हणाल्या, ज्यांची तत्वं जमिनीशी जोडली गेली आहेत, ते काँग्रेस सोडून जाणार नाहीत. काँग्रेस पक्ष हा देशाच्या संविधानासाठी काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘ऑपरेशन सिंदूर’साठी अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे झुकले आहेत. मोदी म्हणतात झुकेगा नही साला आणि ट्रम्प यांच्या पुढे झुकले आणि देशाला कमकुवत केले आहे.
जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, तेव्हा पाकिस्तान इंदिरा गांधींसमोर सरेंडर झाले होते. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष निक्सन यांनाही इंदिरा गांधींचे ऐकावे लागले आणि इकडे नेमकं उलटं झालं आहे. इकडे मोठे मोठे बाण सोडतात आणि तिकडे नतमस्तक होतात. ज्या देशासाठी आपली सेना लढली, त्या सेनेला कमकुवत बनवण्याला नरेंद्र मोदी (Narendra Modi) जबाबदार आहेत असा टोलाही प्रणिती शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरूनही प्रणिती शिंदे यांनी अजितदादांना टोला लगावला. शेतकऱ्यांची कर्जमाफी, लाईट बिल माफी याबाबत निवडणुकीबाबत महायुतीकडून आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अजितदादा म्हणतात, इलेक्शनच्या आधी हे सगळं बोललं जातं, त्यानंतर त्याचे महत्त्व नसतं. म्हणजे, तुमचा वापर केला गेला आहे, तुमची मतं घेतली आणि निवडणूक झाल्यावर तुम्हाला सोडून दिले आणि तुमचा अपमान केला. कारण तुमची किंमत राहिली नाही
महायुतीच्या लोकांमध्ये सध्या प्रचंड मतभेद निर्माण झाले आहेत. या लोकांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत साम-दाम-दंड-भेद वापरून तुम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न केला गेला आहे, असा आरोपही प्रणिती शिंदे यांनी केला.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये काहीही ताळमेळ नाही. ते एकमेकांना खेचत आहेत, त्यामुळे महायुतीमध्ये लवकरच बिघाडी होणार आहे, ती तुटणार आहेत. काँग्रेस पक्ष मात्र कधीही तुटत नाही, तो मजबूत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.