

Karad, 21 February : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा मुद्दा भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा झाला आहे. त्यातच भाजप नेते आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचाच व्हावा, ही माझी मनोमन भावना आहे, कारण आमचे २८ सदस्य आहेत आणि म्हणून आमचा अधिकार आहे. सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा झाला पाहिजे, त्यासाठी जे काय करायला लागेल, ते करायची आमची तयारी आहे आणि ते आम्ही करू, असे गोरे यांनी कऱ्हाड (जि. सातारा) येथे ठणकावून सांगितले.
दरम्यान, सातारा (Satara) झेडपी अध्यक्षपदाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सोडवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे, त्यामुळे मंत्री गोरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते मंत्री मकरंद पाटील आणि शिवसेनेचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांचे टेन्शन वाढवले आहे.
राज्यात भाजप, शिवसेना आणि अजितदादा यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची (NCP) सत्ता आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यात महायुती कुठेच दिसून आली नाही. जिल्ह्यात भाजपविरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी लढत झाली होती. भाजप नेत्यांनी आपल्याच पक्षाला बहुमत मिळेल या आशेने निवडणुकीत सवता सुभा मांडुन निवडणुका लढवल्या. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांना सहकार्याची भूमिका घेऊन निवडणुकीला ते सामोरे गेले होते.
भाजपचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे यांच्याह जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, कऱ्हाड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात सभा घेतल्या. त्याचबरोबर त्या सभांमधून शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील यांना डिवचण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांचे संबंध ताणले जाऊन वातावरण चिघळले आहे.
जिल्हा परिषदेच्या ६५ सदस्यांपैकी भाजपचे २७, राष्ट्रवादी काँग्रेसचे २०, शिवसेनेचे १५, काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रत्येकी एक आणि भाजपचे बंडखोर एक अपक्ष सदस्य असा कौल मतदारांनी दिला आहे. कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेचा स्वतंत्ररित्या दावा करता न येणारा कौल मतदारांनी दिल्याने आता भाजपला सर्वाधिक जागा मिळूनही सत्ता स्थापन करता येईल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
त्यावर मंत्री गोरे यांनी आज कऱ्हाडमध्ये पुन्हा सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भाजपचाच होणार, असा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, जिल्हा परिषद अध्यक्ष हा महायुतीच्या माध्यमातून व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष व्हावा ही माझी मनोमन भावना आहे. त्यासाठी जे काय करायला लागेल, ते करायची आमची तयारी आहे. ते आम्ही करु.
भाजपचा सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला पाहिजे; कारण आम्ही २८ आहोत म्हणून आमचा अधिकार आहे. त्यामुळे महायुती म्हणुन आम्ही प्रयत्न करु. तसे नाही झाले तर अन्य पर्यायांचा विचार करु. मात्र, सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच सोडवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मंत्री गोरे यांनी पुन्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांचे टेन्शन वाढवले आहे.
ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिवसेनेने त्यांचे सदस्य सहलीवर पाठवले आहेत. त्यानिमीत्ताने त्यांना फिरण्याचा योग आला आहे, त्यांची सहल चांगली व्हावी, ज्या उद्देशाने सहल आयोजीत केली आहे, तो उद्देश सफल व्हावा, अशा माझ्या शुभेच्छा आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.