Solapur Bidi Industry : आम्हाला किमान वेतन नको; पण कारखाने बंद करू नका : विडी उद्योग परराज्यात नेण्याच्या धमकीने कामगार हतबल

Bidi workers Agitation : विडी कामगारांना हजार विडींमागे 379 रुपये किमान वेतन देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सोलापूर विडी उद्योग संघाचा विरोध आहे. निर्णय मागे न घेतल्यास कारखाने बंद करण्याचा इशारा आहे.
 Bidi workers Agitation
Bidi workers AgitationSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 24 August : राज्य सरकारने विडी कामगारांना हजार विडीमागे ३७९ रुपये किमान वेतन देण्याचा निर्णय लागू केला आहे. त्या निर्णयाला सोलापूर विडी उद्योग संघाने तीव्र विरोध दर्शविला आहे. सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास १ सप्टेंबरपासून कारखाने बंद करून उद्योग इतर राज्यात स्थलांतरित करण्याचा इशारा विडी उद्योजकांनी दिला होता, त्यामुळे विडी कामगारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

त्या पार्श्वभूमीवर विडी कामगार आणि कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी आज (ता. 24 ऑगस्ट) सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. ‘आम्हाला किमान वेतन नको, रोजगाराची शाश्वती हवी’ अशा घोषणा देत कामगारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

महिला विडी कामगारांनी या वेळी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. आम्हाला किमान वेतन नको. सध्या मिळणाऱ्या २४५ रुपयांच्या मजुरीवर आम्ही समाधानी आहोत. मात्र, कारखाने बंद करू नका, अशी मागणी महिला कामगारांनी केली आहे. विडी कारखाने इतर राज्यांत स्थलांतरित झाल्यास हजारो कामगारांचा रोजगार धोक्यात येईल, अशी भीतीही या महिला कामगारांनी बोलून दाखवली.

 Bidi workers Agitation
Manoj Jarange Patil : 'मराठा-कुणबी प्रमाणपत्रावरून सोलापुरात एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल'

विडी कारखाने बंद झाले किंवा इतर राज्यात गेले आणि आमचा रोजगार गेला, तर कामगार नेते आम्हाला रोजगार देणार आहेत का? असा सवालही महिला कामगारांनी उपस्थित केला. रोजगार हिरावला गेल्यास कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

 Bidi workers Agitation
Solapur DCC Bank : बागलांच्या बल्क सोसायटी पॅटर्नपुढेही जगतापांचा सहकारातील गड अभेद्य!

दरम्यान, कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना देण्यात आले. या वेळी अधिकाऱ्यांनी येत्या दोन ते तीन दिवसांत विडी कारखानदारांची बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com