

अहमदनगर - दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांची भेट झाली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) आज विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी कोपरगावला आले होते. त्यावेळी उपस्थित पत्रकारांनी अजित पवारांना मोदी-शरद पवार भेटी संदर्भात विचारले असता त्यांनी आम्हीच पवार साहेबांना मोदींशी बोला म्हणून विनंती केली होती, असा गौप्यस्फोट केला. ( We were the ones who requested Pawar to talk to Modi )
पंतप्रधान नरेंद्र मोदी व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली. या संदर्भात पत्रकारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता. ते म्हणाले, त्या संदर्भात मला माहिती नाही. कारण मी सकाळी सात वाजता निघालो. शिर्डीला होतो. सकाळी 11 वाजता शिर्डीवरून निघालो. कोपरगावला आलो. कोपरगाववरून मुंबईला गेल्या नंतर त्या बद्दलची माहिती मिळेल.
ते पुढे म्हणाले की, पाठिमागच्या काळात आम्ही शरद पवारांशी मिटिंग घेतली होती. त्यावेळी त्यांना सांगितले होते की, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाने निवडून दिलेले विधानपरिषदेचे 12 राज्यपाल नियुक्त सदस्य आहेत. त्यांची नावे दिलेली आहेत. त्याला काही वर्षे होऊन गेली आहेत. आम्ही अनेक वेळा राज्यपालांना भेटलो मात्र ते विधानपरिषद सदस्यांची नियुक्ती करत नाहीत. चौकशी केली असता कळाले की वरिष्ठ पातळीवर बोला. म्हणून आमचे वरिष्ठ नेते शरद पवार असल्याने त्यांनी दिल्लीत गेल्यावर दिल्लीतील वरिष्ठांशी बोलावे अशी विनंती केली होती. कदाचित त्या बाबतची ती भेट असू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.