

सोलापूरमधील साखर कारखानदार रिकव्हरी जाणूनबुजून कमी दाखवून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करत असल्याचा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला असून दोन दिवसांत निर्णय न झाल्यास कारखान्यांच्या गव्हाणी बंद करण्याचा इशारा दिला आहे.
एक ते दीड टक्के रिकव्हरी कमी दाखवल्याने टनामागे 440 रुपयांचे नुकसान होते, त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस टाकू नये, असे आवाहन शेट्टी यांनी केले आणि भरारी पथक तयार करण्याची घोषणा केली.
साखर कारखानदारांनी मागील दोन वर्षांचे बील न देता नियम मोडला असून राजकीय हस्तक्षेपामुळे साखर आयुक्त कारवाई करत नाहीत, अशी टीका; तसेच नगरपालिका निवडणुकांच्या मतमोजणी स्थगितीवर न्यायालयाचा निर्णय योग्य नाही, असेही शेट्टी म्हणाले.
Solapur, 05 December : सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी अद्याप एफआरपीबाबत तोंड उघडलेले नाही. कारखानदार दराबाबत साखळी करून गप्प आहेत. पण, आम्ही आता गप्प बसणार नाही. दोन दिवस आम्ही वाट पाहू आणि कारखान्यांच्या गव्हाणी बंद पाडणार आहोत. एक टक्के रिकव्हरी कमी दाखवतात, एक टक्के रिकव्हरी मारल्यावर 10 किलो साखर कमी होते, त्यातून टनामागे 440 रुपये कमी होता. सोलापुरात दीड दीड टक्के रिकव्हरी मारणारे महाभाग आहेत, असा गौप्यस्फोट माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) हे आज सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी सोलापूरच्या साखर कारखानदारांनी एफआरपीबाबत घेतलेल्या धोरणाबाबत भाष्य केले आहे. ऊसदराबाबत सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत राजू शेट्टींनी टीका केली आहे.
यावर्षी ऊस कमी असल्याने गाळप कमी होणार आहे. त्यामुळे उसाची पळवापळवी होणार आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील कारखानदारांनी अद्याप एफआरपीबाबत तोंड उघडलेले नाही. कारखानदार ऊसदराबाबत साखळी करून गप्प आहेत. पण, आम्ही आता गप्प बसणार नाही. दोन दिवस आम्ही वाट पाहू, त्यानंतर आम्ही कारखान्याच्या गव्हाणी बंद पाडणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.
शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांनी आत्ताच आपला ऊस कारखान्यांना ऊस घालू नये. सोलापूर जिल्ह्यात रिकव्हरी कमी दाखवली जाते. एक टक्के रिकव्हरी कमी दाखवतात, त्यामुळे एक टक्का रिकव्हरी मारल्यावर 10 किलो साखर कमी होते, त्यातून ४४० रुपये टनामागे मिळतात. सोलापूर जिल्ह्यात दीड टक्के रिकव्हरी कमी दाखवणारे कारखानदार आहेत, त्यासाठी आम्ही आता भरारी पथक करणार आहोत.
साखर आयुक्तांना ऊस दराबाबत आम्ही कळवले आहे. मात्र राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे आयुक्त कारवाई करत नाहीत. नियमानुसार शेतकऱ्याने साखर करखान्याला ऊस दिल्यावर 15 दिवसांत बील देण्याचा नियम आहे. मात्र, अद्याप मागील दोन वर्षांपासून बील दिले नाही. ते बील व्याजासहित द्यायला पाहिजे. मात्र, कारखानदार बील देत नाहीत
झालेल्या निवडणुकांचा इतरत्र परिणाम होत नाही : राजू शेट्टी
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख ही २१ डिसेंबर जाहीर केली आहे. पण कोर्टाने घेतलेला हा निर्णय अनाकलनीय आहे. राज्यातील सुमारे 20 नगरपालिकांच्या निवडणुका पुढे गेल्या; म्हणून इतर ठिकाणची मतमोजणी थांबवणे कितपत योग्य आहे. मुळात ज्या निवडणुका झाल्या, त्याचा परिणाम इतरांवर होत नाही, असा दावाही राजू शेट्टींनी केला आहे.
1. राजू शेट्टी यांची मुख्य मागणी काय आहे?
→ साखर कारखानदारांनी योग्य एफआरपी जाहीर करून शेतकऱ्यांचे नुकसान थांबवावे.
2. रिकव्हरी कमी दाखवल्यावर शेतकऱ्यांचे किती नुकसान होते?
→ एक टक्का रिकव्हरी कमी दाखवली तर टनामागे सुमारे 440 रुपये तोटा होतो.
3. शेट्टी यांनी कोणता इशारा दिला आहे?
→ दोन दिवसांत निर्णय न झाल्यास साखर कारखान्यांच्या गव्हाणी बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला.
4. बील देण्याबाबत शेट्टींचा आरोप काय आहे?
→ कारखान्यांनी दोन वर्षांपासून ऊसाचे बील न देता नियमांचे उल्लंघन केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.