Kolhapur APMC : सहकारात भाजपची एंट्री : पश्चिम महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर पहिल्यांदाच सभापती

Kolhapur Apmc Politics : महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्ट्रर कार्यकर्ते असणारे सूर्यकांत पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचा राजीनामा दिला. यानंतर या पदावर भाजपचा पहिल्यांदाच सभापती झाला आहे.
Kolhapur APMC
Kolhapur APMCsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. महायुती सरकारनंतर पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात भाजपाने आपली पकड मजबूत केली आहे.

  2. इतिहासात पहिल्यांदाच कोल्हापूर एपीएमसीवर भाजपाचा सभापती निवडून आला आहे.

  3. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कमी होत असून सहकारातील राजकीय समीकरणे बदलत आहेत.

kolhapur apmc news : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी नाना कांबळे यांची आज बिनविरोध निवड झाली. ते संजय घाटगे गटाचे म्हणजेच भाजपचे प्रतिनिधी म्हणून बाजार समितीच्या संचालक मंडळात कार्यरत आहेत. बाजार समितीच्या सर्व घटकांना विश्वासात घेऊन कारभार चालविला जाईल, अशी ग्वाही कांबळे यांनी दिली.

तर माजी सभापती सूर्यकांत पाटील यांनी राजीनामा दिल्यांनतर सभापतिपदासाठी नानासाहेब कांबळे यांची निवड झाली. यानंतर राज्यातील महायुती सरकारनं पश्चिम महाराष्ट्रातील सर्व सत्तास्थानं काबीज केल्याचे बोललं जात आहे. तर सहकाराच्या राजकारणावरही भाजपनं आपली पकड मजबूत केली असून इतिहासात पहिल्यांदाच कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपला सभापती केला आहे.

केंद्रात 2014 नंतर सत्ता बदल झाली आणि भाजपने काँग्रेसचे एक-एक गड उद्धवस्त करायला सुरूवात केली आहे. आता २०२६ मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगलीसह कोल्हापुरमधील अनेक स्थानिक स्वराज संस्थांवर महायुतीचा आणि पर्यायाने भाजपचा झेंडा फडकला आहे. आता कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर असणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचं निर्विवाद वर्चस्वही मोडीत काढलं आहे.

Kolhapur APMC
Kolhapur APMC : कोल्हापूर बाजार समितीचे सभापतीपद राष्ट्रवादीने सोडले : तरीही 'मुश्रीफांनी' एकाच दगडात टिपले 3 पक्षी

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी भाजपच्या नाना कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. यामुळे कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातही भाजपची एन्ट्री झाल्याची आता चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा बँक, गोकुळ दूध संघावर आता महायुतीची सत्ता आली असून मंत्री हसन मुश्रीफ यांचे वर्चस्व आहे.

तसेच कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवरही त्यांचे वर्चस्व होते. बाजार समितीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला संधी देऊन सहकारी संस्थावर एकहाती हुकूमत मुश्रीफांनी तयार केली होती. पण मुदत संपण्याआधी सूर्यकांत पाटील यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. येथे भाजपने खेळी खेळत माजी आमदार संजय घाटगे यांच्या शिलेदाराना संधी दिली. तर मुश्रीफांना धक्का दिल्याचे बोलले जात होते. पण आमदार घाटगे हे मुश्रीफांचे ऐकणारे असल्याने त्यांनी बेरजेचं राजकारण साधल्याचे बोललं जात आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सांगली जिल्ह्याचा विचार केल्यास सध्या सातारा जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकहाती सत्ता आहे. तर सांगली शेती उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा अशी महाविकास आघाडीची सत्ता होती. मात्र नुकताच येथे बाजार समितीचे त्रिभाजन झाले असून मविआची सत्ता संपुष्टात आली आहे.

Kolhapur APMC
Kolhapur APMC News: मुश्रीफांच्या निकटवर्तीयाचा पहिला राजकीय बळी; सूर्यकांत पाटलांनी घेतला मोठा निर्णय

FAQs :

1. सहकार क्षेत्रात काय बदल झाले आहेत?
भाजपाने सहकारी संस्थांवर आपली पकड मजबूत करत काँग्रेसचे वर्चस्व कमी केले आहे.

2. कोल्हापूर एपीएमसीमध्ये काय घडले?
पहिल्यांदाच भाजपाचा सभापती निवडून आला आहे.

3. कोणत्या जिल्ह्यांवर याचा प्रभाव आहे?
सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांवर मोठा प्रभाव दिसत आहे.

4. हा बदल कधीपासून सुरू झाला?
2014 नंतर केंद्रात सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर हा बदल वेगाने झाला.

5. या बदलाचा पुढील राजकारणावर काय परिणाम होईल?
सहकार क्षेत्रातील सत्ता बदलामुळे भविष्यातील निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com