Rajan Patil : सोलापूर डीसीसीबाबत देवेंद्र फडणवीसांनी कोणता आदेश दिला?; राजन पाटलांनी केला गौप्यस्फोट...

Solapur Dcc Bank Election 2026 : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजन पाटील यांनी भाजपचे विधान परिषद सदस्य राजेंद्र राऊत यांची बार्शीतील निवासस्थानी भेट घेतली. भेटीत जिल्हा बँक निवडणुकीवर चर्चा झाल्याची माहिती आहे.
Devendra Fadnavis-rajan patil-rajendra raut
Devendra Fadnavis-rajan patil-rajendra raut Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 18 September : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य राजेंद्र राऊत यांची त्यांच्या बार्शीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती आहे. खुद्द राजन पाटील यांनी या भेटीबाबत माहिती दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा बॅंकेबाबत दिलेल्या आदेशाबाबत भाष्य केले आहे.

आमदार राजेंद्र राऊत यांच्या भेटीबाबत माजी आमदार राजन पाटील यांनी आपल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. ते म्हणाले, आमदार राजेंद्र राऊत आणि आम्ही एकाच पक्षात (भारतीय जनता पक्ष) आहोत, त्यामुळे ते जिल्ह्याचे आमदार आहेत. माझ्या तालुक्यात आमदार फंडातून निधी द्यावा, याची मागणी करण्यासाठी राजेंद्र राऊत यांच्या भेटीसाठी गेलो होतो.

सोलापूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत राजन पाटील म्हणाले, सध्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा बॅंकेची निवडणूक शक्यतो बिनविरोध करावी, अशा प्रकारचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आम्हाला दिला आहे. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी काल राजेंद्र राऊत यांची भेट घेण्यासाठी बार्शीला गेलो होतो.

बाळराजेंच्या डीसीसी चेअरमनदाबाबत....

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचा अजून पत्ता नाही. त्यामुळे चेअरमन अन्‌ ते आताच कशाला. आपल्या सोलापूर जिल्ह्याची बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे. निवडणूक झाली तरी त्यानंतर एकत्रिपणे बसून चेअरमनपदाबाबतचा निर्णय घेतला जातो, त्यामुळे त्याला अजून खूप वेळ आहे, असे उत्तर विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांच्या जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर दिले.

Devendra Fadnavis-rajan patil-rajendra raut
Solapur DCC Bank : जिल्हा बॅंक निवडणूक; एक आमदार, दोन माजी आमदार अन्‌ माजी संचालकाने घेतली राजेंद्र राऊतांची भेट, बार्शीची राऊत चाळ केंद्रबिंदू...

मोहोळचे आमदार राजू खरे यांच्याबाबत बोलताना राजन पाटील म्हणाले, प्रशासनाला नाउमेद केले तर त्याचा परिणाम विकासावर होतो. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गेली २५ ते ३० एकत्रित काम करत आहेत. अधिकारी कोणाचेही ऐकून काम करत नसतात. मोहोळ तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचारी हे प्रामाणिकपणे काम करतात. ते गटबाजी करत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी अधिकारी कर्मचाऱ्याला नोकरासारखे वागू नका.

एखाद्या अधिकाऱ्याची आपण तक्रार करू शकतात. पण ज्यांना काम करायची नाही, काम करणाऱ्यांच्या विरोधात आणि अधिकाऱ्यांविरोधात शंखनाद करायचा, अशी तालुक्यात एक प्रवृत्ती सध्या तयार झाली आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis-rajan patil-rajendra raut
Sahyadri Sugar Factory : पाटील अन्‌ घोरपडे-कदमांच्या समर्थकांमध्ये 'सह्याद्री'च्या सभेत बाचाबाची : भाजपच्या आमदारांनी घेतली समांतर सभा

भाचा माझा ऐकेल

राजू खरे मला मामा म्हणतात, त्यामुळे भाचा माझे ऐकेल, असं मला वाटतंय. निधीसाठी मी त्यांना पत्र देईन, असा टोलाही त्यांनी आमदार खरे यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com