
Solapur, 13 April : शेतकरी कर्जमाफीवरून राज्यात सध्या जोरदार रणकंदन सुरू आहे. माजी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येत आहे. त्याबाबत राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन योजना राबविण्यात कॅबिनेट बैठकीत चर्चा झाली आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्त करून त्याचं मनोबल वाढविण्याचे सरकारचे धोरण आहे, असे राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले जलसंधारण मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे माध्यमांशी बोलत होते. त्या वेळी त्यांना शेतकरी कर्जमाफीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राठोड यांनी कर्जमाफीबाबत सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य केले. संजय राठोड हे सोलापुरात (स्व.) चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमासाठी आले होते.
मंत्री राठोड म्हणाले, वचननाम्यातील जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी (Loan Waiver) आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना सरकार राबविणार आहे. कारण शेतकरी समृद्ध झाला पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कॅबिनेट बैठकीत चर्चा झाली आहे. त्या बाबत पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना पुरेशी वीज देणे या संदर्भातली शब्द होता, आता तो आम्ही पूर्ण करत आहोत..
जलसंधारणाच्या कामासाठी राज्य सरकारने मोठी तरतूद केली आहे. जलयुक्त शिवार टप्पा दोन याची कामेही मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. सर्वांना सोबत घेऊन जलसंधारणाची कामे आम्ही करत आहोत, असेही राठोड यांनी स्पष्ट केले
राठोड म्हणाले, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचा विधान मी ऐकलेलं नाही. गुलाबराव पाटील हे विविध संदर्भ देऊन बोलत असतात. परिस्थिती काय होती आणि काय संदर्भ घेऊन बोलले आहेत, याची मी माहिती घेतो, त्यानंतर त्यावर मी बोलतो.
मुंबईवरील 26/11 चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला नुकतेच अमेरिकेतून भारतात आणण्यात आले आहे. हे मोठे यश आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार पारदर्शक, कायद्याचे पालन करणारे आहे. कायद्याच्या माध्यमातून शिस्त आणि कायद्याचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे, त्यामुळे आगामी काळात अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतील, असा दावाही राठोड यांनी केला.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.