Shivendraraje Bhosale : ‘आमचा निर्णय झालाय’ म्हणत मकरंदआबा अन्‌ शंभूराज देसाईंनी वेगळा निर्णय घेतला : शिवेंद्रराजेंनी सांगितली इनसाईड स्टोरी

Satara Dcc Bank President Election 2026 : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून महायुतीत मतभेद समोर आले आहेत. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा करूनही भाजप-शिवसेनेने वेगळा निर्णय घेतल्याचे सांगितले.
Satara Dcc Bank President Election
Satara Dcc Bank President ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara, 20 November : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचे कवित्व जिल्हा परिषदेप्रमाणे सुरू झाले आहे. अध्यक्षपदासाठी आलेले नाव आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील आणि शिवसेनेचे शंभूराज देसाई यांच्यापर्यंत पोचवूनही ‘आमचा निर्णय झालाय’ असे सांगून शिवसेना भाजपच्या नेत्यांनी वेगळाचा निर्णय घेतला, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. पण या निर्णयामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याबाबत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज स्पष्टपणे सांगितले.

मंत्री भोसले म्हणाले, बॅंकेच्या अध्यक्षपदाचा फार्म भरताना आणि आदल्या दिवशी ज्या सूचना माझ्याकडे आल्या होत्या, त्या मी मकरंद पाटील व इतर नेत्यांपर्यंत पोचवल्या होत्या. त्या सूचना पोचवूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने वेगळा निर्णय केला, ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेली चर्चाही मी या नेत्यांशी शेअर केली होती. पण त्यांनी आमचा निर्णय झाला आहे, असे सांगून जिल्हा बॅंकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडी केल्या.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सोसायटी मतदारसंघ वगळता इतर जागांचे वाटप करून घ्या, असे आम्हाला सांगितले होते. या जागा वाटपात काही अडलं तर माझ्याकडे या, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हेातं. त्यानुसार जागावाटप झालं होतं. चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीचाही विषयही स्थानिक पातळीवर चर्चा करून घ्यायचा, असं ठरलं हेातं. काही अडचण आली तर वरिष्ठांसोबत चर्चा करायची, असं नियोजित होतं. पण, मित्रपक्षांनी स्थानिक पातळीवरील अडचणी आणि विषय मांडले, तेही मी वरिष्ठांच्या कानावर घातले, असे शिवेंद्रराजे भोसलेंनी स्पष्ट केले.

Satara Dcc Bank President Election
Solapur Dcc Bank : सुप्रीम कोर्टाचा मोहिते-पाटील, संजयमामा, जगताप, माने, आवताडे, हसापुरेंना दणका; निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेपास नकार देत फेटाळले अपिल

चेअरमन निवडीवेळी मला जे नाव सांगण्यात आलं होतं. तेही मी मकरंदआबांना फोन करून सांगितले हेाते. चेअरमनपदासाठी हे नाव सूचवलं आहे, व्हाईस चेअरमनपदाचा निर्णय आपण घेऊ, असे मी त्यांना म्हटलं होतं. पण त्यांनी आमचा निर्णय झाला आहे, असे सांगून वेगळा निर्णय घेतला, असे शिवेंद्रराजेंनी नमूद केले.

Satara Dcc Bank President Election
Satara DCC Bank : गोरेंनी जिल्हा बँकेतील पराभवाची जबाबदारी घेतली; पण मकरंदआबा अन्‌ शंभूराज देसाईंना कडक इशारा : ‘मी कधीच राजकीय संघर्ष अर्धवट सोडत नाही...’

भोसले म्हणाले, महायुती तुटू नये; म्हणून माझ्याकडे जास्त मतदार असूनही मी माघार घेतली होती. त्यावेळी कार्यकर्ते नाराज झाले होते, त्या वेळी त्यांना आपण हे देवेंद्र फडणवीस आणि पक्षासाठी करतोय, असे सांगून समजूत घातली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.