Afzal Khan's grave | सातारा : शिवप्रताप दिनाच्या दिवशीच प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान कबरीजवळील अतिक्रमक स्थानिक प्रशासनाकडून ह़वण्यात आले. मात्र अफजल खानाच्या या कबरीजवळीच आणखी तीन कबरी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.
अफजल खानाच्या कबरी जवळ असलेले अनाधिकृत बांधकाम पाडण्याची मागणी वारंवार शिवप्रेमींकडून केली जात होती. याच पार्श्वभूमीवर 2006 पासून हा परिसर सील करण्यात आला होता. त्यानंतर अखेर सातारा महसूल विभाग आणि वनविभागाकडून इथे पाडकामाची कारवाई करण्यात आली.
पण पाडकाम करतानाच, या ठिकाणी आणखी तीन कबरी आढळून आल्याने आता या कबरी कोणाच्या आहेत, हा सध्या साताऱ्यातच नव्हे तर राज्यभरात मोठा चर्चेचा विषय बनला आहे. या ठिकाणी आणखी तीन कबरी असल्याच्या वृत्ताला सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दुजोरा दिला आहे. महसूल विभाग या कबरी नेमक्या कोणाच्या आहेत, याबाबत माहिती घेण्याचं काम करत आहे.
दरम्यान, इतिहास अभ्यासक द. बा. पारसनीस यांच्या 1916 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये असलेल्या फोटोत एकच कबर दिसत आहे. त्यामुळे या तीन कबरींबद्दल कोणाच्या असू शकतात, याबद्दल आता उत्सुकता वाढू लागली आहे.
छत्रपती शिवरायांचा इतिहास शिवप्रेमींनाही माहिती व्हावा यासाठी हा परिसर खुला करण्यात यावा, अशी मागणी राज्यभरातील शिवप्रेमींकडून करण्यात येत होती. हा वाद न्यायालयात गेला, न्यायालयानेही येथील अनाधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. त्यानंतर अखेर शिवप्रताप दिनाचा मुहुर्त साधत सातारा महसूल विभाग आणि वनविभागाने या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.