Kolhapur Politics : कोल्हापूर उत्तरचा उमेदवार बदलणार, 'या' नव्या चेहऱ्याला मिळणार संधी

Mahavikas Aghadi On Kolhpaur Uttar Assembly Seat : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला जाणार की ठाकरेंच्या शिवसेनेकड जाणार? याकडेदेखील लक्ष लागून राहिलं आहे.
Rajesh Latkar and Chetan Narke
Rajesh Latkar and Chetan Narke Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 01 Oct : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पैकी नऊ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवारांची बऱ्यापैकी नावे निश्चित झाली आहेत. अनेक मतदारसंघात थेट लढती असल्यामुळे काही मतदारसंघातील लढती स्पष्ट झाल्या आहेत.

मात्र, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार कोण असणार? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला जाणार की ठाकरेंच्या शिवसेनेकड जाणार? याकडेदेखील लक्ष लागून राहिलं आहे.

विद्यमान आमदार काँग्रेसचा (Congress) असल्याने ही जागा काँग्रेसकडेच राहील असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, उमेदवाराबाबत पुसटशी कल्पनादेखील या मतदारसंघातून मतदारांना मिळत नाही. इच्छुकांनी देखील शांत राहण्यास पसंती दिली आहे. तर या मतदारसंघातील उमेदवार बदलणार हे जवळपास निश्चित झाले असून या ठिकाणी नव्या चेहऱ्याला पसंती दिली जाणार असल्याची माहिती आहे.

कोल्हापूर (Kolhapur) उत्तरमधून उमेदवारी मिळवण्यासाठी दीड महिन्यापूर्वी प्रदेश काँग्रेस कमिटीने इच्छुकांकडून अर्ज मागणी केली होती. यामध्ये विद्यमान आमदार जयश्री जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माझी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, अनंत माने, दुर्वास कदम, आर.डी पाटील यांनी अर्ज केले आहेत. शिवाय ठाकरेंच्या शिवसेनेने देखील या मतदारसंघावर दावा केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, उपनेते संजय पवार आणि माजी जिल्हाध्यक्ष विजय देवणे हे इच्छुक आहेत.

Rajesh Latkar and Chetan Narke
Supriya Sule : 'आमचं आयुष्य उध्वस्त करून ते पक्ष, चिन्ह घेऊन गेले; सुप्रिया सुळेंचा कोणावर राग?

सोमवारी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी उमेदवारी अदलाबदलीचे संकेत दिले असल्याने उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी बदलाच्या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. या मतदारसंघातून नव्या चेहऱ्याला संधी मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्याबाबतच्या हालचाली देखील जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर सुरू आहेत. गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांना देखील या मतदारसंघात संधी मिळू शकते.

लोकसभा निवडणुकीत त्यांनी कोल्हापूर उत्तर मध्येदेखील प्रचारात आघाडी घेतली होती. त्याचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो. शिवाय जनमानसात उतरल्यानंतर आणि लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा दिल्यानंतर उत्तर विधानसभा मतदारसंघात त्यांच्याबद्दल सकारात्मक भूमिका इतर नेत्यांची आहे. त्यांचे नाव पुढे आल्यास त्यांना इतर पक्षातून विरोध कमी होऊ शकतो.

Rajesh Latkar and Chetan Narke
Ajit Pawar On Nitin Gadkari : 'लाडकी बहीण' योजनेवरून गडकरींचे सरकारला चिमटे; अजितदादा म्हणतात...

शिवसेना ठाकरे गटाने या मतदारसंघावर दावा केला आहे. मात्र, चेतन नरके या मतदारसंघातून उमेदवारी मिळवल्यास त्यांना ठाकरे गटाकडून देखील हिरवा कंदील मिळू शकतो. कारण लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून तयारी ठेवली होती. त्यामुळे ठाकरे गटातील वरिष्ठ त्यांच्या नावाला सहमती दर्शवू शकतात.

तर दुसरीकडे माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांचे देखील नाव आघाडीवर आहे. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणात त्यांचा सहभाग आहे. शिवाय पत्नी अॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी देखील महापौरपद भूषवलं आहे. लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मधून शाहू महाराज छत्रपती हे भाजपच्या बालेकिल्ल्यातून मताधिक्य देण्यास यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांच्या नावाचा देखील विचार होऊ शकतो. तर माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी मधुरिमाराजे छत्रपती यांचे नाव देखील समोर येऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com