Pawan rajenimbalkar murder case: निकाल विरोधात जाताच ओम राजेनिंबाळकर हताश; कोर्टाच्या बाहेर पडताच म्हणाले, 'हायकोर्टात दाद...'

Pawanraje Nimbalkar murder case News : या निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  MP Omraje Nimbalkar.
MP Omraje Nimbalkar. Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : पवन राजेनिंबाळकर हत्याकांड प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी 20 वर्षानंतर निकाल आला आहे. सबळ पुराव्यांअभावी कोर्टाने या प्रकरणातील मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा निकाल दुर्देवी आहे. या प्रकरणी आता हायकोर्टात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी ओम राजेनिंबाळकर म्हणाले, 'कोर्टाचा निकाल स्वीकारावा लागतो. हा निकाल दुर्देवी आहे. या प्रकरणी आता हायकोर्टात दाद मागणार आहे. माझा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. आता मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करणार आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांचे मते जाणून घेणार आहे. त्यानंतर भविष्याकाळातील राजकीय वाटचालीविषयी अंतिम निर्णय घेणार आहे.'


  MP Omraje Nimbalkar.
Omprakash RajeNimbalkar news : ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या बंडाचे मतदारसंघात जोरदार पडसाद; नगरसेवकांनी उचललं मोठं पाऊल...

उच्च न्यायालयाच्या आदेशानेच पवन राजेनिंबाळकर यांचे हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. आता या निकालानंतर सीबीआयनेच वरिष्ठ न्यायलयात दाद मागणार आहे. त्यांचा याबाबतचा अप्रोच मी बघणार आहे. त्यानंतर मी मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे. त्यासोबतच कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर मी त्यावर योग्य निर्णय घेणार असल्याचे ओम राजेनिंबाळकर यांनी स्पष्ट केले.


  MP Omraje Nimbalkar.
Omprakash RajeNimbalkar news : ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या बंडाचे मतदारसंघात जोरदार पडसाद; नगरसेवकांनी उचललं मोठं पाऊल...

दरम्यान, शनिवारी मुंबई सत्र न्यायालयात पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालाचे वाचन सुरू आहे. त्यासाठी खासदार ओम राजेनिंबाळकर कोर्टात हजर आहेत. त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते या कोर्टबाहेर जमले आहेत. ओम राजेनिंबाळकरांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांचा निषेध केला जात आहे. गद्दारी केली त्यांना विरोध करणारच अशी घोषणाबाजी शिवसैनिकाकडून केली जात आहे.


  MP Omraje Nimbalkar.
Om Raje Nimbalkar: वडिलांच्या हत्येचा निकाल आणखी लांबला; ओमराजे झाले भावूक! म्हणाले, राजकीय विरोधक संपत नसतो तर...

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी बंड केल्याचे समोर आले आहे. हे सहा खासदार ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बैठकीला व वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले आहेत. तर दुसरीकडे ओम राजेनिंबाळकर हे बंडखोर खासदारासोबत असले तरी त्यांची भूमिका अजून जाहीर केलेली नाही. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालानंतर मतदारसंघात जाऊन भूमिका ठरविणार असल्याचे जाहीर केले आहे.


  MP Omraje Nimbalkar.
Pawanraje Nimbalkar murder case: तब्बल 4 दिवसांनंतर ओम राजेनिंबाळकर भावनविवश होत कॅमेऱ्यासमोर : कोर्टात पोहोचताच संतप्त शिवसैनिकांनीही गाठलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com