Om Raje Nimbalkar: वडिलांच्या हत्येचा निकाल आणखी लांबला; ओमराजे झाले भावूक! म्हणाले, राजकीय विरोधक संपत नसतो तर...

Omprakash Raje Nimbalkar: पवन राजेनिंबाळकर हत्या प्रकरणाचा २० वर्षानंतर आज निकाल येणार होता, पण तो पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे.
Om Raje Nimabalkar_Pawan Raje Nimbalkar
Om Raje Nimabalkar_Pawan Raje Nimbalkar
Published on
Updated on

Omprakash Raje Nimbalkar: पवन राजेनिंबाळकर हत्या प्रकरणाचा २० वर्षानंतर आज निकाल येणार होता, पण तो पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. निकाल पुढे ढकलण्यात आल्यानं यावर पवन राजेनिंबाळकर यांचे पुत्र खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते भावूक झाले आणि आपण या केसला निकालापर्यंत आणण्यासाठी केलेला संघर्ष सांगितला. तसंच विरोधकांना एक इशाराही दिला.

Om Raje Nimabalkar_Pawan Raje Nimbalkar
Pawan RajeNimbalkar: पवन राजेनिंबाळकर हत्याकांड प्रकरणी आजचा निकाल पुढे ढकलला; कोर्टानं नेमकं काय म्हटलं?

ओम राजेनिंबाळकर म्हणाले, "निकाल देण्याच्या बाबतीत काही कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी कोर्टानं २० जून ही तारीख ठेवली आहे. आमच्या दोन्ही कुटुंबानं २० वर्षे १३ दिवस अविरतपणे संघर्ष केला आहे. यामध्ये न्यायालयाकडून न्याय मिळावी हीच अपेक्षा आहे. सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष कराव लागतो. माझी क्षमता होती म्हणून मी हायकोर्टात रिट याचिका दाखल करु शकलो, त्या याचिकेच्या आधारे हे प्रकरण सीबीआयकडं गेली. सीबीआयनं यात तपास सुरु केल्यानंतर सगळे आरोप यामध्ये समोर आले. हे समोर आल्यानंतरही गेल्या २० वर्षापासून या खटल्याची अविरतपणे सुनावणी सुरु आहे. कारण जे आरोपी आहेत ते या खटल्याला उशीर व्हावा यासाठी कायम हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जात होते. पण सामान्य माणूस या उच्च कोर्टातील वकिलांची फी देऊ शकत नाही. माझी क्षमता होती आम्ही लढत गेलो म्हणून हे निकालापर्यंत आलं"

Om Raje Nimabalkar_Pawan Raje Nimbalkar
Kolhapur: मंत्री मुश्रीफांवर संशयाची सुई कायम : सतेज पाटलांसोबत 'छुप्या मैत्रीचे' आरोप; सतत द्यावा लागतोय 'महायुती'त असल्याचा पुरावा

माझा राजकारणातला जन्मच या प्रकरणामुळं आहे. माझ्या वडिलांना केवळ राजकीय कारणासाठी संपवण्यात आलं. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार असताना केवळ ४४४ मतांनी त्यांचा पराभव झाला होता. पद्मसिंह पाटलांना पाठिंबा दिला असं खोटं वर्तमानपत्र मतदानाच्यादिवशी छापण्यात आलं. आपल्याला राजकीय विरोधक नको म्हणून पवन राजेनिंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची हत्या केली गेली. ही शांत डोक्यानं कट करुन केलेली हत्या आहे. म्हणून आम्हाला इतकीच अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळावा.

Om Raje Nimabalkar_Pawan Raje Nimbalkar
Pune Transfer Scam : पुण्यात 'आजार' दाखवून बदली रोखण्याचा प्रयत्न; जिल्हाधिकाऱ्यांच्या एका घोषणेनं 60 कर्मचारी झटक्यात झाले बरे...

मी राजकारणात का आलो तर अशा पद्धतीनं तुमचा राजकीय विरोधक संपत नसतो तर तो तयार होत असतो. त्या जिद्दीनं मला धाराशिवच्या जनतेनं इथंपर्यंत पोहोचवलं आहे. आता माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण ज्याच्यासाठी माझा परिवार जगतोय झगडतोय त्या प्रकरणाचा निकाल आमच्या कुटुंबासाठी महत्वाचा आहे. न्यायदेवता निश्चितपणे न्याय करेल, असं सांगताना खासदार राजेनिंबाळकर काहीसे भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com