Petrol Price Hike : निवडणूक संपताच मोठा दणका, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ, पाहा पुणे-मुंबईतील नवीन दर

Petrol-Diesel Price Hike Pune Mumbai Rates : निवडणुकांची रणधुमाळी संपून निकाल जाहीर झाल्यानंतर दहा दिवसानंतर सरकारने पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे.
Petrol and diesel prices increased by Rs 3 from today, adding burden on commuters and transport sector.
Petrol and diesel prices increased by Rs 3 from today, adding burden on commuters and transport sector.sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दहा दिवसानंतर सरकारने मोठा निर्णय घेत पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. पेट्रोल 3 रुपये प्रती लीटर तर, डिझेल 3.11 रुपये प्रतीलीटर महागले आहे. आज (शुक्रवार)पासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.

आजपासून लागू झालेल्या दरवाढीमुळे मुंबई शहरात पेट्रोलचे दर 106.54 रुपये तर डिझेलचे दर 93.14 रुपयांवर गेले आहेत. पुणे शहरात देखील नवीन दरानुसार पेट्रोल 107.84 रुपये तर झिझेल 94.45 रुपये लीटर प्रमाणे मिळणार आहे.

गेल्या काही काळापासून स्थिर असलेले पेट्रोल डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय स्थिती लक्षात घेत वाढवण्यात आले आहेत. 28 फेब्रुवारीपासून इराण अमेरिका यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ होणार होण्याची शक्यता होती. मात्र, सरकारने मागील दोन महिन्यांपासून दरवाढ करण्याचे टाळले होते. मात्र, तेल कंपन्यांचा वाढता तोटा लक्षात घेत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सरकारने ही दरवाढ केली आहे.

पेट्रोल, डिझेलसोबत सरकारने सीएनजीच्या किंमतीमध्ये देखील वाढ केली आहे. पेट्रोल डिझेलच्या तुलनेत ही दरवाढ एका रुपयाने कमी आहे. नवीन दरानुसार सीएनजीचे दर हे दोन रुपयांनी वाढले आहे.

Petrol and diesel prices increased by Rs 3 from today, adding burden on commuters and transport sector.
Illegal Sonography Racket : बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरण तापलं; 'पुणे कनेक्शन'सह गुन्ह्यातील आरोपी डॉक्टरांची संख्या पाचवर, एकूण 16 अटकेत

पंतप्रधानांचे इंधन बचतीचे आवाहन

आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केले होते. सार्वजनिक वाहन, मेट्रोने प्रवास करण्याचे तसेच वर्क फ्राॅम होम करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यांच्या आवाहानला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील गाड्या कमी केल्या होत्या. तसेच इलेक्ट्रीक कारने प्रवास केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील काल दुचाकीवरून मंत्रालयामध्ये आले होते.

शहर पेट्रोल (नवीन दर) डिझेल (नवीन दर) - रुपयांमध्ये

पुणे 107.84 94.45

मुंबई 106.54 93.14

दिल्ली 97.77 90.78

कोलकाता 108.41 95.13

चेन्नई 103.84 95.50

Petrol and diesel prices increased by Rs 3 from today, adding burden on commuters and transport sector.
Thalapathy Vijay : संघाच्या गडात ‘थलपती’ची एंट्री, महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com