Petrol-Diesel Hike : पेट्रोल-डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ; पुणे,मुंबईसह तुमच्या शहरात नवे दर काय?

Petrol-Diesel Mumbai Pune Prices : 15 मे रोजी पहिल्यांदा तब्बल 3 रुपयांनी पेट्रोल तर 3.11 रुपयांनी डिझेलच्या दरात वाढ झाली होती.त्यानंतर तिसऱ्यांदा दरवाढ झाली आहे.
Petrol & Diesel price today in maharashtra
Petrol & Diesel price today in maharashtraSarkarnama
Published on
Updated on

Petrol-Diesel Hike News : इराण-अमेरिका संघर्षाच्या परिणामामुळे सलग तिसऱ्यांदा पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. महागाईचा भडका उडाला असून सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. 15 मे रोजी पहिल्यांदा तब्बल 3 रुपयांनी पेट्रोल तर 3.11 रुपयांनी डिझेलच्या दरात वाढ झाली होती. या वाढीनंतर 20 मे रोजी पुन्हा पेट्रोलच्या दरात 86 पैसे आणि डिझेलच्या दरात 83 किंमतीत वाढ करण्यात आली.

20 मे च्या दरवाढीनंतर आता सलग तिसऱ्यांदा आज (शनिवार) सकाळपासून दरवाढ करण्यात आली नाही. आता पेट्रोल 87 पैसे आणि डिझेल 91 पैशांनी प्रतिलीटर दरवाढ झाली आहे. या नव्या दरामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.45 प्रतीलीटरवर पोहोचले आहेत. तर, पुण्यात 107.87 रुपये प्रतीलीटरवर पोहोचले आहेत.

15 मे रोजी मुंबई शहरात पेट्रोलचे दर 106.54 रुपये तर डिझेलचे दर 93.14 रुपयांवर गेले होते. पुणे शहरात देखील तेव्हा हे दर पेट्रोल 107.84 रुपये तर झिझेल 94.45 रुपये लीटर होते. आता या दरांमुळे जवळपास दोन रुपयांनी वाढ झाली आहे.

Petrol & Diesel price today in maharashtra
Petrol Price Hike : निवडणूक संपताच मोठा दणका, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ, पाहा पुणे-मुंबईतील नवीन दर

पेट्रोल झिझेलची टंचाई

ग्रामीण भागात पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही. परभणीमध्ये डिझेल घेण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रापासूनच रांगा लावाव्या लागत आहेत.तर, खान्देशात झिझेल टंचाईमुळे परराज्यातील वाहने देखील अडकून पडल्याचे सांगितले जात आहे.

शहर पेट्रोलचे दर

मुंबई 108.45

पालघर 108.28

नाशिक 109

धाराशिव 108.85

सातारा 108.77

Petrol & Diesel price today in maharashtra
Maharashtra News : कॅन, ड्रममध्ये डिझेल मिळण्याचा मार्ग मोकळा, जिल्हाधिकाऱ्यांकडून 'तो' आदेश मागे!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com