Municipal election 2026 : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रोड शो दरम्यान आग; यंत्रणांची धावपळ

Political News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शो वेळी फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे भोसरी परिसरातील एका इमारतीवर आग लागल्याची घटना घडली.
bjp flag
bjp flagsarkarnama
Published on
Updated on

Pune News : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. येथील प्रचार मंगळवारी संपणार असल्याने सर्वच पक्षाकडून प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. या रोड शो वेळी फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे भोसरी परिसरातील एका इमारतीवर आग लागल्याची घटना घडली.

हा प्रकार रविवारी सायंकाळी पिंपरीतील भोसरी परिसरात घडला. या रोड शोमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपच्या (BJP) नेतेमंडळींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आगीमुळे कसलेही नुकसान झाले नसल्याचे वृत्त असून अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

bjp flag
BJP vs NCP : 'मोफत शिक्षणाची फाइल अडवणारे, मोफत प्रवास काय देणार? विजयी होणार नाही हे माहिती असल्यानेच अजित पवारांची घोषणा...', भाजपचा हल्लाबोल

आग लागल्याचा प्रकार पुढे येताच याठिकाणी पोलीस यंत्रणेची एकच धावपळ उडाली. यावेळी पोलिसानी तात्काळ याची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर याठिकाणी ही आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले. या वेळी अग्निशमक यंत्रणेकडून तातडीने आग विझवण्यात आली. या आगीमध्ये कसल्याच प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे वृत्त आहे.

bjp flag
Shivsena UBT : स्वीकृत नगरसेवक कोण? ठाकरेंच्या शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी अन् जोरदार रस्सीखेंच

दरम्यान, या पिंपरीत घडलेल्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित रोड शो सुरु होता. या रोड शो ला भाजपच्या नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.

bjp flag
Shivsena VS BJP : शिवसेना जिल्हाप्रमुखाचे भाजप आमदाराला ओपन चॅलेंज; ‘सगळ्या तालमी आमच्यासाठी खमक्या; आता तू फक्त तुझी काळजी कर...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com