PM announcement Fadnavis reaction : पंतप्रधानांच्या घोषणेनंतर, सीएम फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; 'आत्मनिर्भर भारता'चा नारा देत विरोधकांवर हल्लाबोल

Atmanirbhar Bharat slogan News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी 'आत्मनिर्भर भारता'चा नारा देत विरोधकांवर हल्लाबोल केला.
devendra fadnavis | narendra modi
devendra fadnavis | narendra modisarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला देशातील जनतेला संबोधित करताना आत्मनिर्भर भारतासाठी मोठे पाऊल उचलत असल्याचे स्पष्ट केले. त्याच वेळी जीएसटीमध्ये सुधारणा केल्याने मध्यमवर्गीयासाठी बचतीचा उत्सव सुरु होत असल्याचे सांगून उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार आहे. त्यासोबतच येत्या काळात भारताच्या विकासाला गती येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी 'आत्मनिर्भर भारता'चा नारा देत विरोधकांवर हल्लाबोल केला.

यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना सीएम देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला देशातील जनतेला मोठे गिफ्ट दिले आहे. त्याचा फायदा देशातील जनतेला मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूचे दर कमी होणार आहेत. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

devendra fadnavis | narendra modi
Narendra Modi : मोठा धमाका होणार! पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला आज संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतासाठी मोठे पाऊल उचलले आहे. त्याचा फायदा देशातील जनतेला मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे येत्या याकाळात आत्मनिर्भर भारताकडे प्रवास सुरु झाला आहे. त्यांनी या माध्यमातून देशवासियांना नवरात्रीचे मोठे गिफ्ट दिले असल्याचे फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

devendra fadnavis | narendra modi
PM Narendra Modi Live : रायगडमध्ये गोगावलेंच्या कट्टर समर्थकाला मोठा धक्का, कर्जतमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

देशभरात जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत, केंद्र सरकारने जीएसटी संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. पुर्वी जीएसटीचे चार स्लॅब होते, त्यातील दोन रद्द करून आता फक्त 18 टक्के आणि 5 टक्के असे दोनच स्लॅब ठेवण्यात आले आहेत. सुधारीत दर मध्यरात्रीपासून लागू होतील, त्यामुळे अनेक वस्तू आता स्वस्त होणार आहेत. त्याचा फायदा देशातील जनतेला होईल, असेही फडणवीस म्हणाले.

devendra fadnavis | narendra modi
Shivsena Politics : 'आनंद दिघे नेते, उपनेते नव्हते...', PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या जाहिरातीमधील फोटोवरून नवा वाद, दोन्ही शिवसेना आक्रमक

आपल्या देशातील गरीब, मध्यवर्गीय लोक, युवक, शेतकरी, महिला, दुकानदार, व्यापारी, उद्योजक या सर्वांना या उत्सवाचा खूप फायदा होईल. उत्सवांमध्ये प्रत्येक तोंड गोड होणार आहे. या सर्व घोषणांमुळे येत्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

devendra fadnavis | narendra modi
BJP Vs Rohit Pawar : धोबीघाट वाटावी, अशी 'बोंबसभा'? रोहित पवारांच्या आमसभेवर भाजपचा निशाणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com