PM Modi Baramati Visit : PM मोदींचा नियोजित बारामती दौरा अचानक स्थगित : संसदेच्या अधिवेशनाची कुणकुण?

PM Modi Maharashtra visit Postponed : बारामती येथील विद्या प्रतिष्ठान संकुलात उभारलेल्या प्रेरणास्थळ या इमारतीचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. पंतप्रधान कार्यालयाकडून 3 नोव्हेंबर ही तारीख निश्चित देखील करण्यात आली होती. त्या नुसार बारामतीत दौऱ्याची तयारीही सुरू झाली होती.
Sharad Pawar | Narendra Modi
Sharad Pawar | Narendra ModiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Baramati News, 22 Oct : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येत्या 3 नोव्हेंबर रोजी होणारा नियोजित बारामती दौरा स्थगित करण्यात आला असून पुढील तारीख ही लवकरच कळविण्यात येणार असल्याची माहिती विद्या प्रतिष्ठानच्या सूत्रांनी दिली आहे.

विद्या प्रतिष्ठान संकुलात उभारलेल्या प्रेरणास्थळ या इमारतीचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. पंतप्रधान कार्यालयाकडून 3 नोव्हेंबर ही तारीख निश्चित देखील करण्यात आली होती. त्या नुसार बारामतीत दौऱ्याची तयारीही सुरू झाली होती. मात्र, आता अचानक हा नियोजित दौरा स्थगित करण्यात आला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही कारणास्तव पंतप्रधानांचा नियोजित 3 नोव्हेंबरचा दौरा स्थगित करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून विद्या प्रतिष्ठान संस्थेसह खासदार सुप्रिया सुळे यांना कळविण्यात आली आहे. तसंच 16 नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांचा दौरा होऊ शकतो, मात्र या तारखेबाबत अद्याप हिरवा कंदील मिळालेला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Sharad Pawar | Narendra Modi
Manoj Jarange Patil : भाजपकडून 500 कोटी घेतल्याचे पुरावे देण्याचं एकनाथ शिंदेंचं आव्हान : जरांगेंनी थेट 'ती' ऑडिओ क्लिप ऐकवत उडवून दिली खळबळ

मात्र, हा दौरा नेमका कशामुळे रद्द झाला याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच मागील अधिवेशनात केंद्र सरकारने संसदेत आणलेले महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) यासंबंधीची संविधान दुरुस्ती विधेयकं मंजूर झाली नव्हती.

Sharad Pawar | Narendra Modi
Sangli Bank Election : CM फडणवीसांचा फोन अन् 15 जागा बिनविरोध; जयंत पाटलांनी सांगितली सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीची 'इनसाईड स्टोरी'

हीच विधेयकं नव्याने मंजुर करण्यासाठी सरकार संसदेचं अधिवेशन बोलावण्याच्या विचारात असल्याची चर्चा सुरू आहे. तर यामुळेच हा दौरा स्थगित करण्यात आला का? अशीही चर्चा सुरू आहे. मात्र, दौरा नेमका कोणत्या कारणासाठी स्थगित करण्यात आला? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com