

Maharashtra Police Recruitment : सरकारी नोकरीचा विचार करत असाल आणि त्यातही पोलीस भरतीसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. कारण राज्यात पुन्हा एकदा पोलीस भरती होणार असून ८ हाजारांहून अधिक जागा भरल्या जाणार आहेत. या पोलीस भरतीचा कार्यक्रम नेमका कसा असेल जाणून घ्या.
जून २०२७ पर्यंत रिक्त होणाऱ्या ८,१०० पोलीस अंमलदारांच्या जागा भरल्या जाणार आहेत. नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी २०२७ पासून ही भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. यामध्ये एकट्या सोलापूर जिल्ह्यात ११७ जागा भरल्या जाणार आहेत. तर राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणं जागाही भरल्या जाणार आहेत. त्यामुळं राज्यात दरवर्षी १५-२० लाख तरुण पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठी ही महत्वाची संधी आहे.
एकूण जागा - ८१००
अर्जाची मुदत - १ ते ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
भरती प्रक्रिया - १ जानेवारी ते ३१ मार्च २०२७ पर्यंत चालणार
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.