Maharashtra political earthquake : महाराष्ट्राचं राजकारण हादरवणाऱ्या राजकीय भूकंपाचा 2 डिसेंबरपूर्वीच फलटणमध्ये 'ट्रेलर'; शरद पवारांचा विश्वासू नेता अन् एकनाथ शिंदे एकाच स्टेजवर

Maharashtra political twist News : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या स्टेजवर दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Eknath Shinde| Sharad Pawar
Eknath Shinde| Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Political Earthquake In Maharashtra: नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोपाने राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या निवडणूक प्रचारावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलेल्या खळबळजनक व्यक्तव्याने राज्यात 2 डिसेंबरनंतर राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चां जोरात सुरु झाल्या आहेत. नगरपालिका निवडणुका झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात काय घडामोडी होणार याबाबत उत्सुकता ताणली गेली असतानाच आता फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या स्टेजवर दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Eknath Shinde| Sharad Pawar
BJP vs Shivsena : '2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे,' म्हणणाऱ्या रवींद्र चव्हाणांना शिंदेंचं प्रत्युत्तर म्हणाले; 'केंद्रात आणि राज्यात...'

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे 2 डिसेंबरनंतर आता कोणता नवीन राजकीय सिनेमा महाराष्ट्राला पाहायला मिळतो, याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे. त्यातच आता ऐन निवडणूक काळातच फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर हे थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या व्यासपीठावर दिसल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Eknath Shinde| Sharad Pawar
NCP factions alliance : दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीचे वारे वाहत असतानाच अजितदादांविरोधात जुना शिलेदार मैदानात : राजकारणातून थांबण्याचा इशारा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलेल्या खळबळजनक व्यक्तव्याने राज्यात 2 डिसेंबरनंतर राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सध्या एकीकडे जोरात सुरु आहेत. त्याचा पहिला ट्रेलर शुक्रवारी फलटणमध्ये दिसला.

Eknath Shinde| Sharad Pawar
Congress Politics : कोकणात काँग्रेसला 'शह' देणाऱ्या शाहांनाच धक्का, पक्षाने घेतला धडक निर्णय; प्रभारीच्या नियुक्तीही जाहीर

फलटण नगरपालिकेच्या प्रचाराच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर हे थेट शिंदे सेनेच्या व्यासपीठावर दाखल झाले. नगराध्यक्षपदासाठी त्यांचा मुलगा अनिकेत राजे नाईक-निंबाळकर यांना शिंदे यांच्या शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. त्याच्या प्रचारार्थ आयोजित सभेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फलटणमध्ये दाखल झाले होते. या सभेत रामराजेंची उपस्थिती दिसताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

Eknath Shinde| Sharad Pawar
Mahayuti Politics : 'आता घड्याळाची वेळ चांगली नाही, इकडे तिकडे बघू नका...'; शिवेंद्रराजेंनी अजितदादांच्या राष्ट्रवादीला डिवचलं

त्यामुळे येत्या काळात काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वीच रवींद्र चव्हाण आणि शशिकांत शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात 2 डिसेंबरनंतर राजकीय भूकंप होणार असल्याचे भाकीत केले होते. त्यानंतर हे बदल दिसत असल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

Eknath Shinde| Sharad Pawar
Shivsene : ठाकरे-शिंदे एकत्र येणार; संजय शिरसाट काय बोलून गेले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com