NCP factions alliance : दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीचे वारे वाहत असतानाच अजितदादांविरोधात जुना शिलेदार मैदानात : राजकारणातून थांबण्याचा इशारा

Political News : आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची गट्टी जमेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत चर्चा देखील दोन्ही राष्ट्रवादीकडून सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
Ajit Pawar Shard Pawar
Ajit Pawar Shard PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची गट्टी जमेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत चर्चा देखील दोन्ही राष्ट्रवादीकडून सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही स्थानिक नेते देखील यासाठी आग्रही आहेत, असेही बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी आघाडी करायची नाही, अशीच भूमिका प्रशांत जगताप यांनी घेतली असून जर आघाडी झाल्यास आपण राजकारणात थांबू, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे.

Ajit Pawar Shard Pawar
BJP Candidate Rush: इच्छुकांची भाऊ गर्दी महापालिका निवडणुकीसाठी भाजपची डोकेदुखी, शिवसेना ठाकरे पक्षाला लागणार का लॉटरी!

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन भाग झाल्यानंतर पुण्यातील माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासारखा नेता पुन्हा होणार नाही. त्यांनी पूर्वगामी चळवळीसाठी आपल्या आयुष्यातील 68 वर्षात दिले असल्याने काही झाले तरी शरद पवार यांची आपण साथ सोडायचे नाही. या दृष्टिकोनातून त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Ajit Pawar Shard Pawar
Shivsena Eknath Shinde Politics: बिहार पॅटर्नची महापालिका निवडणुकीत अंमलबजावणी होते की काय? मतदार याद्या पाहून सत्ताधारीही चक्रावले!

आता आगामी महापालिका निवडणुकासाठी आमचा पक्ष सज्ज असून महाविकास आघाडी म्हणून आम्ही या निवडणुकीत उतरण्याचा विचार करत आहोत. त्या दृष्टिकोनातून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांसोबत प्रत्येकी दोन बैठका देखील झाल्या आहेत. पुणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी आपल्या पक्षाकडून 265 जणांनी निवडणूक लढण्यासाठी सशुल्क अर्ज भरून दिले आहेत. तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढल्या असल्यामुळे कार्यकर्त्यांची आघाडीच्या पक्षांसोबत तडजोड करण्याची भूमिका आहे. परंतु, पुणे शहराचे वाटोळे या महायुतीतील तीन पक्षांमुळे झाले असल्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याची मानसिकता आमची नाही.

Ajit Pawar Shard Pawar
NCP Pune News : पुणे महापालिकेत राष्ट्रवादीची 'गट्टी' जमणार? माजी महापौरांच्या गुप्त भेटीमुळे चर्चांना उधाण!

काही दिवसांपासून दोन राष्ट्रवादी पुण्यामध्ये एकत्र येणार याबाबत चर्चा सुरू आहेत. मात्र महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा विचार करत असेल जेणेकरून तिकडच्या चार लोकांचा आणि आमच्या दोन लोकांचा फायदा होईल, या संकुचित भावनेतून काही निर्णय झाले तर मी या सर्व प्रोसेसपासून दूर राहून आपले राजकारण काही दिवसांसाठी थांबेल, असा इशारा जगताप यांनी दिला.

Ajit Pawar Shard Pawar
Congress Politics : कोकणात काँग्रेसला 'शह' देणाऱ्या शाहांनाच धक्का, पक्षाने घेतला धडक निर्णय; प्रभारीच्या नियुक्तीही जाहीर

महापालिका निवडणुकीमध्ये भाजपसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या राष्ट्रवादीची युती होत नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षातील काही जणांचा आग्रह आहे की, आमच्यासोबत युती करायचा, मात्र निवडणुकानंतर ते पुन्हा भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे. तसेच जर महायुतीतील एखाद्या पक्षाची आम्ही युती केली तर निवडणुकांमध्ये आम्हाला ज्या महायुती सरकारवर टीका करायचे आहे, त्या टीकेचा रोख बदलेल आणि निवडणुकीतील हवाच निघून जाईल, अशी परिस्थिती निर्माण होईल, असेही जगताप म्हणाले.

Ajit Pawar Shard Pawar
BJP Candidate Rush: इच्छुकांची भाऊ गर्दी महापालिका निवडणुकीसाठी भाजपची डोकेदुखी, शिवसेना ठाकरे पक्षाला लागणार का लॉटरी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com