paradnya satav, harshvardhan Sapkal
paradnya satav, harshvardhan Sapkal Sarkarnama

Pradnya Satav : प्रज्ञा सातव यांचे काँग्रेसमधील योगदान काय? त्यांच्यामुळेच अनेक जण दुखावले; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनीही डागली तोफ!

Congress internal conflict News : काँग्रेसला धक्का, पोकळी निर्माण झाली अशा विशेषणांचा वापर सातव यांच्या भाजप प्रवेशानंतर केला जात आहे.
Published on

Hingoli News : काँग्रेसच्या विधान परिषदेतील आमदार प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमधून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काँग्रेसला धक्का, पोकळी निर्माण झाली अशा विशेषणांचा वापर सातव यांच्या भाजप प्रवेशानंतर केला जात आहे. परंतु प्रज्ञा सातव यांचे काँग्रेसमधील योगदान काय? असा प्रश्न थेट प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीच उपस्थित केला.

विधान परिषदेवर संधी दिल्यानंतरही प्रज्ञा सातव यांनी जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी खूप प्रयत्न केले किंवा लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जीवाचे रान करून काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला असे कधी दिसून आले नव्हते. त्या काही जनसामान्यातील नेत्या नव्हत्या. उलट त्यांच्या वागणुकीमुळे पक्षातील अनेक जण दुरावले गेले, तरीही पक्षाने कधी त्यांना याबद्दल जाब विचारला नाही. असे असताना त्यांनी काँग्रेससोडून भाजपमध्ये जाणे नेमके कशासाठी? हे उमगत नाही, अशा शब्दात हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली.

paradnya satav, harshvardhan Sapkal
BJP Dynasticism : भाजपमध्ये 'घराणेशाही', पुणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात राजकीय नेत्यांची मुलं! टिळक, मुळीक, मिसाळ, बापट, कांबळेंकडून 'फिल्डींग'?

काँग्रेसचे (Congress) दिवंगत नेते राजीव सातव यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली गेली, पण हे त्यांना कळालेच नाही. आमदार झाल्यावर त्यांनी कधीही पक्ष वाढवण्यासाठी काम केल्याचे दिसून आले नाही. उलट त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन अनेक जण दुरावले गेले. तरीही त्यांना पक्षाने कधी अंतर दिले नाही. तरीही त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला याचे दुःख वाटते.

paradnya satav, harshvardhan Sapkal
Nanded Mahayuti : अशोक चव्हाण भाव देईनात, युतीसाठी शिवसेनेच्या हेमंत पाटलांनी धरला राष्ट्रवादीचा रस्ता!

त्यांच्या पक्ष सोडून जाण्याने काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली किंवा पक्षाला मोठा धक्का बसला, असे मानण्याची अजिबात गरज नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले. भाजपच्या नैतिकतेवरही सपकाळ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपला आणखी किती आमदारांची भूक आहे? या पक्षाला काही नैतिक अधिष्ठान आहे की नाही? असा सवालही यावेळी सपकाळ यांनी उपस्थित केला.

paradnya satav, harshvardhan Sapkal
Pragya Satav Resign : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार?

राजेश राठोड काँग्रेसमध्येच

प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशावेळी मराठवाड्यातील काँग्रेसचे विधान परिषदेचे आणखी एक आमदार राजेश राठोड यांच्याही नावाची चर्चा होती. परंतु गुरुवारी फक्त सातव यांचाच पक्ष प्रवेश झाला. यावरही हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Spakal) यांनी राजेश राठोड यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. गुरुवारी सायंकाळपर्यंत काँग्रेस प्रदेश कार्यालयामध्ये ते आमच्या सोबत होते. त्यामुळे त्यांच्या नावाविषयी शंका नाही, असे सपकाळ यांनी सांगितले.

paradnya satav, harshvardhan Sapkal
Pradnya Satav join BJP news : हिंगोलीत काँग्रेसचा सफाया; प्रज्ञा सातव भाजपमध्ये सामील, 'या' एका कारणामुळे फिरली सर्व सूत्रं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com