Bombay High Court decision: मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का; 76 लाख वाढीव मतदानाच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Prakash Ambedkar News : निवडणूक आयोगाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी याचिका दाखल केली होती.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत सायंकाळी पाचनंतर झालेल्या 76 लाख मतदानावर आक्षेप घेऊन, निवडणूक आयोगाविरोधात मुंबई हायकोर्टात प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी संध्याकाळपर्यंत सुनावणी झाली होती. त्यामुळे या याचिकेवर कोर्ट काय निर्णय घेणार याची उत्सुकता लागली होती.

या याचिकेसंदर्भातील सुनावणी सोमवारी पूर्ण झाली होती. त्यानंतर निर्णय बुधवारी देण्यासाठी न्यायालयाने राखून ठेवला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने यासंदर्भातील निर्णय दिला. सुनावणीवेळी कोर्टात प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी निवडणूक आयोगाविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली. त्यामुळे आंबेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Prakash Ambedkar
Shivsena UBT-MNS : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा खासदार अन् राज ठाकरेंच्या शिलेदाराची एकत्र पत्रकार परिषद; नेमकं कारण काय?

निवडणूक आयोगाविरोधात (Election Commision) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी याचिका दाखल केली होती. विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेनंतर झालेल्या 76 लाख मतदानावर प्रकाश आंबेडकर यांनी अक्षेप घेतला होता. ही याचिका सॊमवारी दिवसभर ऐकून आमच्या कामकाजाचा वेळ वाया गेला, असेही हायकोर्टाने म्हटले आहे.

Prakash Ambedkar
Mahayuti Politics: महायुतीत मोठा भाऊ भाजप; लहान भाऊ एकनाथ शिंदे की अजित पवार? फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यानंतर राजकारण फिरणार!

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाचनंतर झालेल्या 76 लाख मतदानावर प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतला होता. या याचिकेमध्ये काही प्रमुख मागण्या आणि आक्षेप घेतले होते, त्यामध्ये संध्याकाळी पाचनंतर जे 76 लाख मतदान वाढले, त्यामध्ये 19 अशा जागा होत्या, ज्यामध्ये मतदान सर्वाधिक वाढले होते. एवढं मतदान अचानक कसं वाढलं, असा प्रश्न त्यांनी आपल्या याचिकेमधून उपस्थित केला होता.

Prakash Ambedkar
Eknath Shinde mega plan : मुंबई महापालिका जिंकण्यासाठी शिंदेंचा आणखी एक निर्णय; आदित्य ठाकरेंनी उभ्या केलेल्या संघटनेकडेच मोठी जबाबदारी

प्रकाश आंबेडकर यांच्या या याचिकेवर सोमवारी दिवसभर सविस्तर युक्तिवाद झाला. न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. बुधवारी न्यायालयानं या संदर्भात निकाल दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरीफ यांच्या खंडपिठाने हा निकाल दिला आहे.

Prakash Ambedkar
Eknath Shinde : 'कॉमन मॅन' असताना दोन, चार जागांसाठी महायुती कशासाठी करायची; शिंदेंच्या शिवसेनेचा सवाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com