Eknath Shinde : 'कॉमन मॅन' असताना दोन, चार जागांसाठी महायुती कशासाठी करायची; शिंदेंच्या शिवसेनेचा सवाल

Mahayuti politics News: शिंदे सेनेकडे एकही माजी नगरसेवक नाही. ही आकडेवारी बघता भाजप शिंदे सेनेसाठी जागा सोडण्यास राजी नाही. अनेकांचा यास विरोध आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : महापालिकेची निवडणूक होणार असल्याने सर्वत्र युती आणि आघाडीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मोठ्या पक्षांचा कल स्वबळावर लढण्याचा आहे. त्यामुळे छोट्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. आपण स्वबळावर लढण्यास टिकाव लागेल का असा ही प्रश्न त्यांना पडत आहे, असे असले तरी शिंदे सेनेच्या नागपूरमधील पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत युती करून चारदोन जागेवर लढण्यास विरोध केला आहे.

दुसरीकडे शिवसेना (Shivsena) कशाच्या बळावर मते मागणार? असा सवालही केला जात आहे. यावर आमचे नेते एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेली विकास कामे तसेच त्यांचा ‘कॉमन मॅन' चेहरा हीच शिवसैनिकांची शिदोरी असल्याचा दावा शहर प्रमुख सुरज गोजे यांचा आहे.

Eknath Shinde
Malegaon Sugar Factory Election Result : माळेगाव कारखान्याचा दुसऱ्या दिवशी पहिला निकाल आला, 1427 मतांनी मारली बाजी; अजितदादा विरुद्ध रंजन तावरेंमध्ये कोण पुढे?

सध्या नागपूरमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा दोन सेना कार्यरत आहेत. कार्यकर्ते विखुरले गेले आहेत. यापूर्वी शिवसेनेचे दोनच नगरसेवक निवडून आले होते. ते उद्धव यांच्याकडे आहेत. शिंदे सेनेकडे एकही माजी नगरसेवक नाही. ही आकडेवारी बघता भाजप शिंदे सेनेसाठी जागा सोडण्यास राजी नाही. अनेकांचा यास विरोध आहे.

Eknath Shinde
Malegaon Sugar Factory : अजितदादांची तावरे गुरु-शिष्याला धोबीपछाड; ‘माळेगाव’मध्ये निर्विवाद विजयाकडे वाटचाल

यापूर्वी भाजपच्या (BJP) एका नेत्याने जागा मागताना आपताना अंथरून पाहून पाय पसरण्याचा सल्ला दिला आहे. यावर शिंदे सेनेचे शहर प्रमुख सूरज गोजे म्हणाले, स्वतःच्या ताकदीवर नागपूरमध्ये लढणे पक्षासाठी योग्य राहील. विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला एकही मतदारसंघ सोडला नव्हता. आमचे कार्यकत्यांनी भाजपचाच प्रचार केला. त्यांचे कमळ घरोघरी पोहचले. आता महापालिकेच्या निवडणुकीमुळे शिवसैनिकांना संपर्क साधता येणार आहे, धनुष्यबाण घेऊन मतदारांकडे जाता येणार आहे. युतीमध्ये राहिलो तर फार काही जागा भाजप सोडणार नाही. हे दिसतच आहे. त्यापेक्षा आम्ही सर्व जागांवर लढलो तर जास्त फायद्याचे ठरेल. कार्यकर्तेसुद्धा समाधानी राहतील.

Eknath Shinde
Ajit Pawar : 'झेंडा महायुतीचा... पण महापौर राष्ट्रवादीचाच...' अजित पवार यांच्या आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

प्रत्येकाला आपली ताकद कळेल. महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झालो तरी पक्षाचा टक्का समोर येईल. भविष्यातील निवडणुकीचे नियोजन यातून करता येईल. शिवसैनिकांचा स्वबळाचा आग्रह यासाठीच आहे. आम्ही नागपूरमधील शंभर बुथवर निवडणुकीचे नियोजन केले आहे. काही चांगले आणि निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार आमच्याकडे आहेत. चार सदस्यांच्या प्रभाग ही आमची अडचण आहे. मात्र एक सदस्यीय प्रभाग पद्धती असती तर आमच्या 30 ते 40 नगरसेवकांचा आकडा महापालिकेत दिसला असता.

Eknath Shinde
Shivsena UBT-MNS : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा खासदार अन् राज ठाकरेंच्या शिलेदाराची एकत्र पत्रकार परिषद; नेमकं कारण काय?

आता चार सदस्यांचा प्रभाग जाहीर झाला आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे. आम्ही उमेदवार निवडताना अ. ब. क. अशी कॅटेगिरी तयार केली आहे. गरजेनुसार सर्वांचा वापर केला जाईल. नागपूरमधील शिवसैनिकांची स्वतःच्या ताकदीवर महापालिकेची निवडणूक लढण्याची भावना आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवली आहे. महायुतीचा अद्याप निर्णय व्हायचा आहे. मात्र, आम्ही आमची तयारी करतो आहे.

Eknath Shinde
Shivsena Politics: कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात शिंदेंच्या शिवसेनेला 'अच्छे दिन',इच्छुकांच्या रांगा; पण 'ही' असणार टांगती तलवार

आमच्याकडे एकनाथ शिंदे यांचा चेहरा आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या कामांची शिदोरी आहे. त्यांच्यात दिसणारा ‘कॉमन मॅन' मतदाराना भावतो आहे. हीच शिंदे सेनेची जमेची बाजू आहे. महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल काय लागेल याने काही फरक पडत नाही, मात्र आमची ताकद सर्वांना दिसेल, असा दावाही सूरज गोजे यांचा आहे.

Eknath Shinde
Shivsena News : भास्कर जाधवांची औकात नसताना 1995 मध्ये बाळासाहेबांना तिकीट द्यायला लावले; शिवसेनेच्या नेत्याचा हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com