Thackeray Vs Thackeray : 'ठाकरे नमाज पडायचेच बाकी, राऊत नव्याने मुस्लिम झाले...', राज ठाकरेंच्या शिलेदाराची जळजळीत टीका

Prakash Mahajan Criticizes Uddhav Thackeray Sanjay Raut : प्रकाश महाजन म्हणाले, हिंदुत्वाला न्याय देण्यासाठी वक्फ सुधारणा कायदा मोदी सरकारने आणला. मात्र, नव्याने मुस्लिम झालेले संजय राऊत या गोष्टी विसरतात.
Raj Thackeray Uddhav Thackeray Sanjay Raut
Raj Thackeray Uddhav Thackeray Sanjay Rautsarkarnama
Published on
Updated on

Prakash Mahajan News : वफ्त सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. राष्ट्रपतींनी हा विधेयकावर स्वाक्षरी केल्याने विधेयकाचे रुपांतर कायद्यात झाले आहे. मात्र, लोकसभेत या विधेयक मांडल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या विधेयकाच्या विरोधात मतदान केले. त्यावरून आता मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

वक्फ कायदा हा दान केलेल्या जमीनच्य संदर्भात होता. मात्र, उद्धव ठाकरे आत्ता फक्त नमाज पडायचेचे बाकी आहेत तर संजय राऊत नव्याने मुस्लिम झाल्याने अदाब अदाब करत आहेत, असे टोला प्रकाश महाजन यांनी लगावला.

Raj Thackeray Uddhav Thackeray Sanjay Raut
Nitesh Rane Thackeray warning : 'राणे साहेबांच्या अटकेचा क्षण अजूनही मोबाईलमध्ये सेव्ह'; भाजप मंत्री राणे म्हणाले, 'तेव्हाच तो डिलिट...'

महाजन म्हणाले, हिंदुत्वाला न्याय देण्यासाठी वक्फ सुधारणा कायदा मोदी सरकारने आणला. मात्र, नव्याने मुस्लिम झालेले संजय राऊत या गोष्टी विसरतात. मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढू घ्या असे बाळासाहेब ठाकरे म्हणत होते आणि उबाठा काय करत आहे? उबाठा धर्मांध मुस्लिमांच्या बाजुने उभे राहत आहे.

उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाशी काही संबंध राहिला नाही. ते फक्त नमाज पडायचे बाकी राहिले आहेत, असे मी मागे म्हटले होते. वक्फ बिलाचा आणि हिंदुंच्या मंदिरांचा काही संबंध नाही, असे महाजन म्हणाले. तसेच या विधेयकामुळे हिंदुच्या देवस्थानावर पण नियंत्रण आणले जाईल, असा आरोप शिवसेना उद्धवबाळासाहे ठाकरे पक्षाकडून केला जातो आहे त्यामध्ये काही तथ्य नाही, असे देखील महाजन म्हणाले.

वक्फचा हेतूचा कळला नाही...

वक्फ विधेयक आणले ते काही मुस्लिम धर्माच्या विरोधात नव्हते की नमाजाच्या विरोधात नव्हते. अमित शाहांनी सांगितले की 2013 ते 2025 पर्यंत वक्फची संपत्ती अफाट वाढली. यावर कुठेतरी वक्फवर नियंत्रण हवे होते त्यामुळे सरकारने जे विधेयक आणले त्याचे हिंदुने स्वागत केले पाहिजे. मात्र, काही हिंदू खासदारांनी देखील या विधेयकाच्या विरोधात मतदान केले, असे प्रकाश महाजन म्हणाले.

वक्फवर ठाकरेंचा काय दावा?

वक्फ विधेयकाच्या विरोधात मतदान करणाऱ्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विरोधात मतदानाचे समर्थन केले होते. मोदींना वक्फच्या जमीनी आपल्या मित्रांना द्यायचा आहेत म्हणून हा कायदा आणल्याची टीका संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी केली होती. तसेच या कायद्यातून हिंदू-मुस्लिम वाद पेटण्याचा देखील प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला होता.

Raj Thackeray Uddhav Thackeray Sanjay Raut
Santosh Deshmukh Murder Case : विष्णू चाटेला जेलमध्ये करमेना, पुन्हा हवी वाल्मिक कराडची साथ; न्यायलायत केला अर्ज

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com