Congress Politics : काँग्रेसचा दिल्लीतील मोठा नेता तातडीने मुंबईत, भाजपला मिळणार चोख प्रत्युत्तर; राहुल बोंद्रेंच बंड शमले अन् पुढची रणनीती ठरली!

Rahul Bondre KC Venugopal Meeting : राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश टळला आहे. भाजपकडून सुरू असलेल्या हालचालींची गंभीर दखल काँग्रेस हायकमांडने घेतली असून मोठ्या नेत्याला तातडीने मुंबईला पाठवल्याची माहिती आहे.
Rahul Gandhi call Rahul Bondre .jpg
Rahul Gandhi call Rahul Bondre .jpgSarkarnama
Published on
Updated on

Congress News : महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपकडून काँग्रेसचे बडे नेते फोडण्याची रणनीती आखली जात आहे. विरोधामध्ये नेत्याच शिल्लक ठेवायची नाही, अशी रणनीती असल्याची चर्चा आहे. मात्र, काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी भाजपमध्ये जाण्याचे जाहीर केल्यानंतर राहुल गांधींनी त्यांना फोन केला. बोंद्रे यांनी या फोनंतर आपला निर्णय बदलत काँग्रेसोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला.

दरम्यान, बोंद्रे यांचे बंड शमल्यानंतर मुंबईत काँग्रेसची खलबतं झाल्याची माहिती समोर आली आहे. सरचिटणीस के सी वेणुगोपाल हे तातडीने मुंबईत आले आणि त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस नेत्यांची बैठक झाल्याचे वृत्त 'साम टिव्ही'ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

भाजपकडून काँग्रेस नेत्यांवर दबाव टाकत त्यांना पक्ष प्रवेश करण्यास भाग पाडले जात असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी काँग्रेसकडून हालचाली सुरू आहेत. थेट काँग्रेस हायकमांडचे प्रतिनिधी मुंबईत आले. के सी वेणुगोपाल यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक घेतल्याचे 'साम'ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

Rahul Gandhi call Rahul Bondre .jpg
Rahul Bondre News : राहुल गांधींनी मातब्बर नेत्यांनाही कधी थांबवलं नाही; मग 2 टर्म आमदार राहिलेल्या बोंद्रेंसाठी थेट फोन का? वाचा Inside Story

काँग्रेसमध्ये उत्साह

महाराष्ट्र काँग्रेसच्या राजकारण थेट हायकमांडने लक्ष घातले आहे. काँग्रेस नेत्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी के सी वेणूगोपाल हे मुंबईत आले त्यांनी एका मोठ्या हाॅटेलमध्ये महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेत त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. राहुल बोंद्रे यांना थांबण्यासाठी स्वतः राहुल गांधी यांनी फोन केला. त्यामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये उत्साह असून हायकमांड महाराष्ट्राकडे विशेष लक्ष देत असल्याचे मत नेते खासगीत व्यक्त करत आहेत.

Rahul Gandhi call Rahul Bondre .jpg
Rahul Bondre News : राहुल गांधींच्या फोननंतर बोंद्रेंचा भाजप प्रवेश रद्द, मध्यस्थी करणारा अहिल्यानगरचा 'बडा नेता' तोंडावर पडला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com