Sharad Pawar : काँग्रेसकडून शेवटचा प्रयत्न; राहुल गांधी, सोनिया गांधी खास विमानाने मुंबईला जाणार, शरद पवारांची घेणार भेट!

Delimitation Sonia Gandhi Sharad Pawar Rahul Gandhi : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी खास विमानाने मुंबईला येणार आहेत.
Sharad Pawar And Rahul Gandhi
Sharad Pawar And Rahul Gandhisarkarnama
Published on: 
Updated on: 

Rahul Gandhi News : केंद्र सरकारकडून डिलिमीटेशन बील पास करण्यासाठीआवश्यक संख्याबळ जमवले आहे. डीएमकेने या बीलाला पाठींबा दिला आहे. तर, शरद पवारांची राष्ट्रवादी देखील या बीलाल पाठीबा देणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, आता विरोधकांची एकजुट कायम राहावी म्हणून स्वतः सोनिया गांधी मैदानात उतरल्या आहेत.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे खास विमानाने मुंबईत येणार आहेत. ते रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेणार आहेत. या भेटीत डिलिमीटेशनला विरोध करण्यासंदर्भात ते पवारांशी चर्चा करतील.

हे तिन्ही नेते सर्वप्रथम एकत्र खास विमानाने चेन्नईला जाणार आहेत. तेथे ते एम के स्टॅलिन यांची भेट घेतील. त्यानंतर त्यांच्या चर्चा करून त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न करणार आहेत. त्यानंतर तेथून थेट मुंबईला येणार आहेत आणि शरद पवारांची भेट घेणार आहेत.

राहुल गांधी यांनी काल डिलिमीटेशनच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांना शरद पवारांच्या पक्षाने विरोधात भूमिका घेतली तर इंडिया आघाडीतील त्यांचे स्थान काय राहणार असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर राहुल गांधी यांनी स्पष्ट केले होते की, शरद पवार यांनी या बीलाला पाठींबा दिला किंवा विरोध केला तरी त्यांचे जे पूर्वी इंडिया आघाडीत स्थान होते तेच राहणार आहे.

Sharad Pawar And Rahul Gandhi
BJP Politics : NCP आमदाराच्या बालेकिल्ल्यात भाजपची नवी खेळी; जुन्या जनत्या नेत्याकडे पुन्हा शहराध्यक्षपद

पाठींबा म्हणजे एनडीएसोबत जाणे नव्हे

डीएमकेच्या नेत्या कनिमोळी यांनी स्पष्ट केले की,डीएमकेचा डिलिमीटेशन बीलाला पाठींबा म्हणजे आम्ही एनडीएसोबत जाणार असा होत नाही. यापूर्वी काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी देखील भाजपच्या बिलाला पाठींबा दिला होता. डीएमके पक्षाने शनिवारी चेन्नईमध्ये आपल्या खासदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत डिलिमीटेशनच्या बिलाला पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Sharad Pawar And Rahul Gandhi
Sharad Pawar NCP Delimitation : डिलिमिटेशनवरून मविआत ठिणगी! काँग्रेस-ठाकरेंना नीलेश लंकेंचा थेट इशारा; ‘बळजबरीने कोपऱ्यात ढकलू नका’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.