Rahul Narwekar legal action : संजय राऊतांना आरोप करणे महागात पडणार, राहुल नार्वेकर मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत, म्हणाले, 'काही तासांत...'

Rahul Narwekar legal action against Sanjay Raut : संजय राऊत यांच्या आरोपांवर राहुल नार्वेकर आक्रमक झाले आहेत. राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची तयारी नार्वेकर यांनी दर्शवली असून, काही तासांत मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे.
Rahul Narwekar on sanjay raut
Rahul Narwekar on sanjay rautSarkarnama
Published on: 
Updated on: 

शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा दावा करत राहुल नार्वेकर यांनी त्यांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. येत्या काही तासांत संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची तयारी असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

राहुल नार्वेकर यांच्या म्हणण्यानुसार, शिवसेनेतील फुटीबाबत दिलेल्या निर्णयामुळे संजय राऊत नाराज आहेत. याच नाराजीतून ते आपल्यावर आरोप करत असल्याचा दावा नार्वेकर यांनी केला. राऊत यांना कोणतेही परिणाम भोगावे लागत नसल्याने ते बिनधास्तपणे आरोप करतात, अशी टीकाही त्यांनी केली.

Rahul Narwekar on sanjay raut
YS Sharmila : माजी मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला वडिलोपार्जित घरात जाण्यापासून पोलिसांनी रोखलं, कौटुंबिक वाद चव्हाट्यावर!

संजय राऊत यांच्या आरोपांवर नार्वेकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "सकाळी नऊ वाजता उठायचे आणि मनात येईल ते बोलून टाकायचे, अशी सवय राऊत यांना झाली आहे."

याशिवाय, अलिबाग आणि भांडुपमधील जागांसंदर्भातील कथित वादांचा उल्लेख करत त्यांनी राऊत यांच्यावर पलटवार केला.

जमिनीच्या व्यवहारावरून करण्यात आलेल्या आरोपांनाही नार्वेकर यांनी प्रत्युत्तर दिले. संबंधित प्रकरण हे 2024 मधील असून, पूर्वीच्या जमीन मालकांमध्ये आणि स्थानिक आदिवासी नागरिकांमध्ये तक्रारी झाल्या होत्या. या तक्रारींची सुनावणी मानवी हक्क आयोगाकडे गेली होती. त्यानंतर तहसीलदारांनी चौकशी करून अहवाल सादर केल्याचे त्यांनी सांगितले.

नार्वेकर यांच्या दाव्यानुसार, संबंधित आदिवासी नागरिकांनी आपली कोणतीही तक्रार नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. तसेच त्यांना मोबदला आणि पर्यायी पक्की घरे मिळाल्याचेही कागदपत्रांमध्ये नमूद आहे. मूळ तक्रारीत नार्वेकर कुटुंबातील कोणाचाही उल्लेख नव्हता. संबंधित जमीन भोगवटादार क्रमांक 1 च्या मालकीची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Rahul Narwekar on sanjay raut
Rahul Narwekar : जमीन लाटल्याच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचा संजय राऊतांवर पलटवार, आरोप फेटाळत म्हणाले, 'अजिबात तथ्य नाही...'

दरम्यान, संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याच्या नार्वेकर यांच्या इशाऱ्यामुळे हा राजकीय संघर्ष आता न्यायालयापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. नार्वेकर प्रत्यक्षात कायदेशीर पाऊल उचलतात का आणि संजय राऊत त्यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.