Rahul Narwekar : जमीन लाटल्याच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचा संजय राऊतांवर पलटवार, आरोप फेटाळत म्हणाले, 'अजिबात तथ्य नाही...'

Rahul Narwekar Sanjay Raut controversy : जमीन लाटल्याच्या आरोपांवर राहुल नार्वेकर यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. आरोप फेटाळत त्यात अजिबात तथ्य नसल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
Rahul Narwekar : जमीन लाटल्याच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचा संजय राऊतांवर पलटवार, आरोप फेटाळत म्हणाले, 'अजिबात तथ्य नाही...'
Published on: 
Updated on: 

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अलिबाग येथील जमीन व्यवहार आणि आदिवासी कुटुंबांच्या पुनर्वसनावरून राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. आता या प्रकरणावर राहुल नार्वेकर यांनी आपली बाजू मांडत संजय राऊत यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. संबंधित जमीन आदिवासींची नसून भोगवटा क्रमांक 1 मधील असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच 2024 पूर्वी आदिवासी बांधवांनी केलेल्या तक्रारींचा निपटारा झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Rahul Narwekar : जमीन लाटल्याच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचा संजय राऊतांवर पलटवार, आरोप फेटाळत म्हणाले, 'अजिबात तथ्य नाही...'
Mayor By Election : ‘युतीधर्म भाजपनेच का पाळायचा? शहर मुश्रीफमुक्त करणार!’ आगामी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीवरून शिवाजी पाटलांचे खुले आव्हान

राहुल नार्वेकर यांच्या म्हणण्यानुसार, 2024 पर्यंत या जमिनीची मालकी बलदेवसिंह जाला यांच्याकडे होती. त्या काळात दाखल झालेल्या तक्रारींमध्ये नार्वेकर कुटुंबीयांचे नाव नव्हते. नार्वेकर यांच्या पत्नीने 2024 नंतर जाला यांच्याकडून ही जमीन खरेदी केली. त्यामुळे यापूर्वीच्या तक्रारींशी नार्वेकर कुटुंबाचा संबंध जोडणे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

या जमिनीवरील आदिवासी कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबतही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. संबंधित जमीनमालकाकडून आदिवासी बांधवांना पर्यायी जागेवर पक्की घरे बांधून देण्यात आली आहेत. याशिवाय त्यांना आर्थिक मदत आणि पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेलची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. पुनर्वसनानंतर कोणतीही तक्रार शिल्लक नसल्याचे प्रतिज्ञापत्र संबंधित आदिवासी बांधवांनी दिले होते, असा दावाही नार्वेकर यांनी केला.

दरम्यान, या प्रकरणावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली होती. संजय राऊत यांनी यासंदर्भात अधिकृत तक्रार दाखल केल्यास त्याची चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

विशेष म्हणजे, एप्रिल 2025 मध्ये प्रशासनाकडूनही या जमिनीबाबत खुलासा करण्यात आला होता. तहसीलदार आणि संबंधित यंत्रणांनी केलेल्या पडताळणीनुसार ही जमीन भोगवटा क्रमांक 1 मधील असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच आदिवासी कुटुंबांना पर्यायी जागेवर घरे उपलब्ध करून दिल्याची माहिती चौकशी अहवालात नमूद असल्याचे समोर आले होते.

Rahul Narwekar : जमीन लाटल्याच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचा संजय राऊतांवर पलटवार, आरोप फेटाळत म्हणाले, 'अजिबात तथ्य नाही...'
YS Sharmila : माजी मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला वडिलोपार्जित घरात जाण्यापासून पोलिसांनी रोखलं, कौटुंबिक वाद चव्हाट्यावर!

त्यामुळे संजय राऊत यांचे आरोप आणि राहुल नार्वेकर यांनी दिलेले स्पष्टीकरण यामुळे जमीन व्यवहाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणातील आरोपांची वस्तुस्थिती आणि प्रशासनाच्या अहवालाकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.