Thackeray Brothers Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या निवडणूक आयोगाविरोधातील गर्जना मोर्चानंतर अडचणी वाढणार; मोठे कारण आले समोर

Garjana Morcha Mumbai News : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील वातावरण चांगलंच तापले आहे. त्यातच आता या मोर्चानंतर ठाकरे बंधुसमोरील अडचणी वाढणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Raj Thackeray, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Uddhav ThackeraySarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना व राज ठाकरेंच्या मनसेकडून रविवारी निवडणूक आयोगाविरोधात गर्जना मोर्चा काढण्यात आला. ठाकरे बंधूच्यावतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात विरोधी पक्षासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यावेळी उद्धव व राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून टीका केली. ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. विरोधी पक्षांकडून सातत्याने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील वातावरण चांगलंच तापले आहे. त्यातच आता या मोर्चानंतर ठाकरे बंधुसमोरील अडचणी वाढणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुंबईत ठाकरे बंधूंच्यावतीने काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, काँग्रेस,शेतकरी कामगार पक्षाचे नेते सहभागी झाले होते. त्यासोबतच इतरही विरोधी पक्षांनी मोर्चाला पाठिंबा दिला होता. या मोर्चामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील वातावरण तापले आहे. त्यातच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चाला परवानगीच नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मुंबईतील आझाद मैदान वगळता कुठेही या मोर्चाला परवानगी नव्हती, त्यामुळे आता ठाकरे बंधूंच्या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. बेकायदेशीरपणे जमाव जमवणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल होणार आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मनसे व ठाकरेंच्या सेनेसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Gyanesh Kumar removal : ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा नको, थेट बडतर्फ करा; पृथ्वीराज चव्हाणांची ठेवलं कायद्यावर बोट

दरम्यान, या मोर्चावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार टीका केली. या मोर्चासाठी मोठा जनसागर उसळला होता. भारतामधून जवळपास 13 कोटी लोकांची नावे मतदार यादीमधून वगळण्यात अली असल्याने निवडणूक आयुक्तांच्या नेमणूकीवर आक्षेप घेतला जात आहे.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Ramdas Athawale : 'ज्ञानेश कुमारांनी दबावाखाली राजीनामा देऊ नये', केंद्रीय मंत्र्याकडून पाठराखण; काँग्रेसला प्रत्युत्तर, 'राजीनामा जनता पार्टी...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com