मनसे नेता म्हणाला हात दुखतोय अन् राज ठाकरेंनी थेट मलमच लावून दिले...

काही पदाधिकारी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भेटीला त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी
Raj Thackeray - Manoj Chavan 

Raj Thackeray - Manoj Chavan 

Sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा दरारा उभ्या महाराष्ट्राला परिचीत आहे. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते, पक्षाचे नेते, पत्रकार हे देखील त्यांच्यासमोर जाताना विचार करुन जातात. पण आज महाराष्ट्राला आणि मनसे (Maharashtra Navnirman Sena) कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांचे एक वेगळे पण अतिशय प्रेमळ रुप पहायला मिळाले. याबाबतचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राज ठाकरेंचे त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांशी आणि नेत्यांशी किती भावनिक संबंध आहे हे दिसून येत आहे.

त्याच झालं असं की मनसेच्या कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण (Manoj Chavan) आणि काही पदाधिकारी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भेटीला त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते. यावेळी सहज बोलताना मनोज चव्हाण यांनी राज ठाकरेंना "आज खांदा खूप दुखतोय साहेब असं म्हटलं." त्यावर राज ठाकरेंनी थांब जरा, म्हणत सहकाऱ्याकडून मलम मागवले आणि चव्हाण यांच्या खांद्यावर स्वत: हाताने ते लावले. राज ठाकरेंच्या या प्रेमामुळे चव्हाण काहीसे भावूक झाले होते.

मनसेचे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी हा व्हिडीओ शेअर करत "मी राजसाहेबांना दैवत का म्हणतो याची प्रचिती पुन्हा एकदा आली" असं म्हटलं आहे. मनसेला सध्या मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. नुकतीच महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीमध्ये आज व्हायरल झालेला व्हिडिओ कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये भावनिक नात कायम असल्याचे सांगत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com