Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. नवीन राणा, विजया राहटकर यांच्या नावाची चर्चा सुरू असताना नागपूरमधील माया इवनाते यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
इवनाते आदिवासी नेत्या आणि नागपूरच्या माजी महापौर आहेत. त्यांना काल अचनाक मुंबईतून बोलवणे आल्याने त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले. इवनाते यांच्यासोबत रामदास आठवले, विनोद तावडे, रामराव वडकुते यांना देखील उमेदवारी जाहीर झाली आहे.
इवनाते हा नागपूर महापालिकेच्या विद्यमान सदस्या आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्या विजयी झाल्या. त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा देखील अनुभव आहे. अनुसूचित जमातीच्या राष्ट्रीय आयोगाच्या सदस्या म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.
आज दुपारी भाजपच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस गुरुवार (ता. 5) आहे. तर, अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस शनिवार (ता.7) आहे.
माया इवनाते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निकटवर्ती समजल्या जातात. त्यांना राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगावर काम करण्याचा अनुभव देखील आहे. त्यामुळे आदिवासी समाजातून राज्यसभेसाठी महिला उमेदवार देण्याचे महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वाने निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.