Ramrao Wadkute: राष्ट्र प्रथम...! राज्यसभेवर संधी मिळताच वडकुतेंनी स्पष्ट केली भूमिका

Rajya Sabha Nomination 2026 : रामराव वडकुते यांनी राज्यसभेवर संधी दिल्याबद्दल भाजप नेतृत्वाचे आभार मानत धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने काम करण्याची ग्वाही दिली. मराठवाड्याच्या प्रतिनिधित्वावर त्यांनी भर दिला.
Ramrao Wadkute expresses gratitude to BJP leaders Narendra Modi and Devendra Fadnavis after being nominated to Rajya Sabha from Maharashtra.
Ramrao Wadkute expresses gratitude to BJP leaders Narendra Modi and Devendra Fadnavis after being nominated to Rajya Sabha from Maharashtra.Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada BJP News : माझ्या घरात कोणी पंचायत समितीचा सदस्यही नाही, गरीब कुटुंबातील माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला भाजपाने राज्यसभेसारख्या सर्वोच्च सभागृहात काम करण्याची संधी दिली. माझे डोळे भरून आले आहेत. मिळालेल्या या संधीचं सोन करून धनगर समाजाच्या प्रश्नासाठीच सातत्याने काम करेन. कुटुंब चालवण्यासाठी या पदाचा वापर करणार नाही, अशा शब्दात राज्यसभेवर भाजपाकडून संधी मिळालेले रामराव वडकुते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राज्यसभेसाठी अनेपेक्षितपणे धनगर समाजाचे नेते माजी आमदार रामराव वडकुते यांना उमेदवारी जाहीर झाली. भाजपाच्या धक्का तंत्राची झलक यातून पुन्हा दिसून आली. वडकुते यांच्या निवडीने परभणी-हिंगोली जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर आमदार राहिलेल्या रामराव वडकुते यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. आपल्या भाजपा प्रवेशाबद्दलही वडकुते यांनी भाजपाच्या'राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष अन् शेवटी स्वतः' विचाराने प्रेरित होऊन आपण पक्षात प्रवेश केल्याचे सांगीतले.

राज्यातील धनगर समाजाला आरक्षण देण्याचा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. पण तांत्रिक कारणामुळे ते देता आले नाही, याची कबुलीही त्यांनी दिली होती. आदिवासी समाजाला लागू असलेल्या अनेक सुविधा देवेंद्र फडणवीस यांनीच लागू केल्या होत्या. धनगर समाजाला आरक्षण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच देऊ शकतात. समाजातील गोरगरीब घटकाला सोबत घेऊन चालण्याच्या भाजप नेत्यांच्या धोरणामुळेच आपण या पक्षात येण्याचा निर्णय घेतला होता. राज्यसभेवर मला संधी देत भाजपाने आम्ही सर्व समाजासोबत न्याय करतो, हा संदेश दिला आहे.

धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठी राज्यसभेवर मिळालेल्या संधीचा आपण पुरेपूर उपयोग करून घेऊ. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सातत्याने सगळ्या जाती-धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, असे सांगतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना विधान परिषदेत धनगर आरक्षणाच्या मुद्यांवर मी अनेकदा सभागृहाचे कामकाज बंद पाडले होते.

Ramrao Wadkute expresses gratitude to BJP leaders Narendra Modi and Devendra Fadnavis after being nominated to Rajya Sabha from Maharashtra.
Rajyasabha Election : पंकजा मुंडेंना पर्याय तयार करण्याचा भाजपाचा डाव फसला; संधी मिळालेले भागवत कराड अन् रमेश कराड ठरले फेल!

शरद पवारांनी मला तेव्हा काम करण्याची संधी दिली. पण या पक्षात राहून समाजाचा प्रश्न सोडवता येणार नाही, हे लक्षात आल्यानंतर आपण अकरा महिने आमदारकीचा काळ शिल्लक असताना राजीनामा दिला आणि भाजपामध्ये प्रवेश केल्याचे वडकुते यांनी सांगीतले. पक्ष प्रवेशाच्या वेळी कुठल्याही पदाची अपेक्षा केली नाही. दिली ती जबाबदारी स्वीकारली आणि काम करत होतो.

Ramrao Wadkute expresses gratitude to BJP leaders Narendra Modi and Devendra Fadnavis after being nominated to Rajya Sabha from Maharashtra.
BJP Rajya Sabha Candidate : भाजपचे धक्कातंत्र, राज्यसभेसाठी नागपूरच्या माया इवनातेंना उमेदवारी

पक्षाने राज्यसभेवर संधी दिली त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील सर्वच नेत्यांचे आभार मानतो, असे म्हणत रामराव वडकुते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com