Manikrao Kokate Vs Rohit Pawar : 'तब्बल 22 मिनिटे कोकाटे पत्ते खेळत होते, विधीमंडळाचा चौकशी अहवाल...', रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

Manikrao Kokate Legislature Inquiry Report : माणिकराव कोकाटे यांच्यावरील पत्ते खेळण्याच्या विधीमंडळ चौकशी समितीच्या अहवालाबाबत सरकार खुलासा करेल का? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.
Rohit Pawar On Manikrao Kokate
Rohit Pawar On Manikrao Kokate Sarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar News : विधीमंडळात पत्ते खेळत असल्याचा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोध आक्रमक झाले होते. मंगळवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना खडेबोल सुनावल्याची माहिती आहे. मात्र,त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला नाही.

कोकाटेंना उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिलासा मिळालेला असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी धक्कादायक दावा केला आहे.

कृषिमंत्री सभागृहात केवळ 42 सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल असून हा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे, असे रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे.

या अहवालाबाबत सरकार खुलासा करेल का? सभागृहात तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्र्यावर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्व. अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्व. यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? असा सवाल देखील रोहित पवार यांनी केला आहे.

Rohit Pawar On Manikrao Kokate
Local Body Elections : मोठी बातमी! स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीचा मुहूर्त ठरला! नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद अन् महापालिका...

'तो' व्हिडिओ कोणी काढला?

माणिकराव कोकाटे यांनी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, मी रमी खेळत नव्हते तर विधीमंडळाचे कामकाज युट्यूबवर पाहत होते. त्यावेळी पत्त्यांची जाहिरात आली ती कट करत होतो तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. दरम्यान, सभागृहातमध्ये कोकाटे हे पत्ते खेळत असल्याचा व्हिडिओ नेमका कोणी काढला याविषयी तर्कवितर्क लढवले जात होते. सत्ताधारी आमदारांच्या बाकावरील हा व्हिडिओ असल्याने सत्ताधारी आमदारांवर संशय व्यक्त केला जात होता. मात्र, हा व्हिडिओ प्रेक्षक गॅलरीतून काढण्यात आले असल्याचे विधीमंडळाच्या अहवालत नमूद केल्याची सांगितले जात आहे.

Rohit Pawar On Manikrao Kokate
Sunil Kedar News: माजी मंत्री सुनील केदारांना मोठा झटका; जिल्हा बँकेपाठोपाठ आता बाजार समितीतील वर्चस्वही संपुष्टात येणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com