Rupali Chakankar : रुपाली चाकणकर पुन्हा अ‍ॅक्टिव्ह, म्हणाल्या, ‘राजकारणात चढउतार, काम सुरूच...'

Rupali Chakankar Politics : रुपाली चाकणकर या नांदेड दौऱ्यावर आहेत. त्यांनी या दौऱ्यात विध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
Rupali Chakankar
Rupali Chakankarsarkarnama
Published on: 
Updated on: 

Rupali Chakankar News : 'राजकारणात चढ-उतार येत असतात. राजकारणात पुनरागमन किंवा कमबॅक असा कोणताही विषय नसतो. पक्षात प्रवेश केल्यापासून प्राथमिक सदस्य म्हणून काम करत आहे. पदे येतात आणि जातात; मात्र पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम सुरूच राहणार, अशी प्रतिक्रिया महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. नांदेड दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना त्या म्हणाल्या, अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी दुःख बाजूला ठेवून पक्ष आणि कार्यकर्त्यांसाठी खंबीरपणे नेतृत्व केले. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीतही त्यांच्या नेतृत्वाची झलक पाहायला मिळाली. सुनेत्रा पवार यांच्या रूपात आदिशक्तीचा जागर दिसत आहे.

नांदेड दौरा धार्मिक, राजकीय नाही

नवरात्रोत्सवात आदिमाया आदिशक्तीचा जागर सुरू असताना बंजारा समाजाच्या आग्रहावरून आणि धर्मगुरूंच्या निमंत्रणावरून नांदेडला आले आहे. काल गुरुद्वाराचे, तर आज पोहरादेवीचे दर्शन घेतले. त्यामुळे हा दौरा धार्मिक असून, त्याला राजकीय स्वरूप देऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Rupali Chakankar
NCP News : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 नगरसेवकांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा, अभ्यासिकेमध्ये घुसले अन्...

शेतकरी मदतीवर तोडगा निघेल

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीतील घटक पक्ष यावर चर्चा करून योग्य तोडगा काढतील, असे आपण ऐकले आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसह संबंधित प्रश्न शासन स्तरावर सोडवले जातील, असे चाकणकर म्हणाल्या.

Rupali Chakankar
Maval BJP: मावळमध्ये भाजपला दणका! सरकारी जागेवरील अतिक्रमण भोवलं; नगरसेवकपद रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com