

Pune News: सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत वडगाव नगरपंचायतीतील भाजपचे नगरसेवक रोहित मंगेश धडवले यांना अपात्र ठरविण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक तीनमधून निवडून आलेल्या धडवले यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. मावळमधील भाजपला धक्का बसला आहे.
धडवले यांच्याविरोधात अंकुश किसन तुमकर आणि गणेश अंकुश तुमकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अपील दाखल केले होते. सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप त्यांनी या अपिलातून केला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी डुडी यांनी धडवले यांना नगरसेवकपदी राहण्यास अपात्र ठरविण्याचा आदेश दिला.
वडगाव नगरपंचायतीची निवडणूक २ डिसेंबर २०२५ रोजी झाली होती, तर २१ डिसेंबरला निकाल जाहीर झाला होता. या निवडणुकीत भाजपने प्रभाग क्रमांक तीनमधून धडवले या तरुण उमेदवाराला संधी दिली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक प्रभाव असलेल्या या प्रभागात धडवले यांनी विजय मिळविला होता. मात्र, सरकारी जागेवरील अतिक्रमणाच्या तक्रारीनंतर झालेल्या कारवाईमुळे त्यांना नगरसेवकपद गमवावे लागले आहे.
निवडणुकीत विजय मिळवून नगरपंचायतीत प्रतिनिधित्व करणाऱ्या धडवले यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच, मावळमधील भाजपसाठीही हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
पुणे शहरातील काही नगरसेवकांबाबत देखील अशाच अतिक्रमणा संदर्भात आणि अनधिकृत बांधकाम संदर्भात महापालिका आयुक्तांकडे तक्रार या असून त्याबाबतची लवकरच सुनावणी होणार आहे. पुणे शहरातील अनाधिकृत बांधकामे असलेल्या नगरसेवकांचे देखील धाबे दणाणले आहे. शहरातील या नगरसेवकांच्या पात्रतेबाबत आयुक्त कधी निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.