
Ambadas Danve News : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल राज्य सरकारचे चांगलेच वाभाडे काढले. विशेषतः कृषीमंतत्र्यांच्या कारभाराचा असा पंचनामा केला की, सत्ताधारी अस्वस्थ झाले. (Agriculture Minister Dhananjay Munde disturb after denve`s speech)
शिवसेनेचे (Shivsena) अंबादास दानवे (Amabadas Danve) यांच्या वक्तव्याने अस्वस्थ झालेले कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) या चर्चेत हस्तक्षेप करीत कृपया तत्कालीन कृषीमंत्री असा उल्लेख करावा असे म्हणाले.
विरोधी पक्षाच्या प्रस्तावावरील चर्चेला श्री. दानवे यांनी प्रारंभ केला. यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या कारभाराचे चांगलेच वाभाडे काढले. ते म्हणाले, आपले मंत्री राज्यातील बीयाने कंपन्यांच्या एव्हढे मागे लागलेत की त्यांना सळो की पळो करून सोडले आहेत.
या कंपन्या काही चुकीचे करीत असतील तर त्यांच्यावर जरूर कारवाई केली पाहिजे. मात्र कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ज्या पद्धतीने काम केले, त्याने वेगळीच शंका येते. या कारभाराला कंटाळून अनेक कंपन्या दुसऱ्या राज्यात जात आहेत. साडे तीनशे कंपन्या गुजरात आणि तेलंगणा राज्यात गेल्या आहेत. त्याची आकडेवारी व कारणे माझ्याकडे आहेत.
अब्दुल सत्तार यांनी काही अधिकारी घेऊन बियाने कंपनीवर धाड टाकण्यास पाठवले. त्यात नियमानुसार गुण नियंत्रण अधिकारी असायला हेव होते, मात्र ते त्यात नव्हते. मंत्र्यांचे पीए या धाडीत होते. एव्हढेच नव्हे तर त्या कंपनीतील एक बडतर्फे अधिकारी देखील त्या पथकात होता. कंपनीच्या प्रशासनाने त्यांना ओळखल्यावर संशय आला. त्यांमी माध्यमांना बोलावले. त्यातून हा सगळा गैरप्रकार उघड झाला. त्या पथकाने कंपनी सील केली. सील करण्याचा कोणताही अधिकार पथकाला नाही. विक्री बंद करण्याचे आदेश देण्याचा नियम आहे.
या सर्व प्रकाराविरोधात बातम्या आल्यावर तो प्रकार उघड झाला. त्याबाबत पोलिसांत तसेच कृषी विभागाकडे तक्रार देण्यात आली. त्यावर एक महिना झाला. अद्याप गुन्हा दाखल नाही. काहीच कारवाई नाही. राज्य सराकर यावर मुग गिळून गप्प आहे. याचा अर्थ ते मंत्र्यांच्या अशा कारभाराला पाठीशी घालत आहेत.
या सर्व आरोपांवर अन्य सदस्यांनीही दानवेंना पाठींबा दिला. त्याने सभागृहात उपस्थित असलेले कृषीमंत्री धनंजय मुंडे खुपच अस्वस्थ झाले. त्यांनी हस्तक्षेप करीत कृपया तत्कालीन कृषीमंत्री असे म्हणावे. मी आत्ताच मंत्री झालो आहे. चर्चेचे गांभिर्य लक्षात घेऊन मी स्वतः सभागृहात उपस्थित राहीलो. त्यावर दानवे यांनी मी कृषीमंत्री अब्दुल सत्तार असे नाव घेऊन आरोप करीत असे स्पष्ट केल्यावर मुंडे आसनावर बसले. मात्र एकंदरच या चर्चेत राज्य शासनानेही एव्हढे गंभीर आरोप होत असताना मंत्री सत्तार यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला नाही, असे दिसले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.