Local Body Election : 'तीन कोटीपर्यंत खर्च, एका व्यक्तीकडून 100 बोकडं', जिल्हा परिषद निवडणुकीचा खर्च आमदार संजय गायकवाडांनी सांगितला

Sanjay Gaikwad Shivsen BJP : आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत युती, आघाडी होणार की नाही याची चर्चा सुरू असताना उमेदवाराला किती खर्च करावा लागतो याची आकडेवारी आमदार संजय गायकवाड यांनी मांडली आहे.
Sanjay Gaikwad
Sanjay GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Gaikwad News : आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या तयारी सुरुवात राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. युती, आघाडी होणार की नाही याचे चित्र अजुनही स्पष्ट नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते स्वबळावर लढण्याची तयारी करत आहेत. त्याचा बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी युतीवर भाष्य करताना कार्यकर्त्यांना किती खर्च करावा लागतो याची माहिती जाहीर कार्यक्रमात दिली.

गायकवाड म्हणाले, 'आता जिल्हा परिषद, पंचायती समिती, नगर परिषदेच्या निवडणुका सोप्प्या राहिल्या आहेत का? एक-एक दोन-दोन तीन-तीन कोटी तर काही ठिकाणी शंभर बोकडं एका जणाकडून दिली जातात. येवढ्या महाग निवडणुकीत कार्यकर्ता उद्धवस्त होतो.

'आम्ही शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या युतीला प्राधान्य देणार. आम्हाला भाजप-शिवसेना युती पाहिजे. ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे. कारण आम्ही आमदारकीला युती करतो. लोकसभेला युती करतो आणि ज्यावेळी छोट्या कार्यकर्त्याची गरज येते तेव्हा आपण त्यांना वाऱ्यावर सोडतो. त्यांनी काय खर्च करून मातीत जायचं?' असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

Sanjay Gaikwad
Eknath Shinde Twitter hack : एकनाथ शिंदेंच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर तुर्की अन् पाकिस्तानचे व्हिडिओ दिसल्याने खळबळ, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

...तर मी युतीला तयार

शिवसेना-भाजप युती झाली पाहिजे, असे आमदार गायकवाड यांनी सांगताना जे चिखली, मलकापूर, खांबगाव मध्ये धोरण धरेल तेच धोरण बुलढाण्यात ठरलं तर आपण युतीला तयार आहोत, असे जाहीर केले. छोट्या कार्यकर्त्यांना या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतील खर्च झेपणार नाही. त्यामुळे युती झाली पाहिजे कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, असे देखील ते म्हणाले.

भाजपचा स्वबळाचा नारा...

आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती होणार का? याची चर्चा सुरू असताना भाजप कार्यकर्त्यांकडून स्वबळाचा नारा दिला जातो आहे. मुंबईसोडून भाजप सगळीकडे स्वबळावरच लढेल, असा विश्वास देखील कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे,संधी मिळाली पाहिजे यासाठी भाजपने स्वबळावर लढले पाहिजे, असे देखील भाजपमधील काही पदाधिकारी म्हणत आहेत.

Sanjay Gaikwad
MSRTC Recruitment 2025 : ST मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! तब्बल 'इतक्या' हजार जागांसाठी मेगाभरती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com