Sanjay Raut allegations against Omraje Nimbalkar: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा'चे सहा खासदार जाणार असल्याचं आता जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. तर याच सर्व चर्चांवर अधिकृत भाष्य करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज दिल्लीत एक पत्रकार परिषद घेण्यात आली.
या पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत यांनी खासदारांवर त्यांच्याकडे (शिंदेंच्या शिवसेनेत) जाण्यासाठी अनेक प्रकारचा दबाव आणला जात असल्याचं म्हटलं. तर यावेळी उदाहरण देताना राऊत यांनी धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांचा उल्लेख करत खळबळजनक दावा केला.
ओमराजेंच्या वडिलांच्या हत्या प्रकरणाचा निकाल जर त्यांना मनासारखा पाहिजे असेल तर त्यांनी आमच्याकडे यावं, अशी ऑफर दिल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, " देशात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना फोडण्याचं काम सुरू आहे. ते लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात आहे.आम्ही कोणत्याही पक्षाचं किंवा खासदाराचं नाव घेतलं नाही. मात्र, दबाव कसा येतो ते पहा. ओम राजेनिंबाळकर यांचंही नाव त्या यादीत आहे. २० वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांची पवनराजे यांची हत्या झाली.
पवनराजे हत्या प्रकरणाचा खटला २० वर्षांपासून सुरू आहे. या प्रकरणाचा काल निकाल लागणार होता. पण आमच्यापर्यंत अशी माहिती आहे, त्यांच्यावर असा दबाव आहे की, "जर तुमच्या बाजून निकाल पाहिजे असेल तर आमच्या गटामध्ये सामील व्हा तुम्हाला हवा तसा निकाल देतो." अशी माहिती त्यांच्यापर्यंत एका महत्त्वाच्या व्यक्तीमार्फत पोहचवण्यात आली. त्यामुळे काल पवनराजे आणि त्यांचा ड्रायव्हरच्या हत्येचा निकालाचा दिवस २० वर्षांनी आला. मात्र, तो निकाल पुढे ढकलण्यात आला," असा गंभीर दावा राऊतांनी केला.
राऊतांच्या या दाव्यामुळे आता थेट न्यायव्यस्थाच मॅनेज करण्यात आली की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय जर अशा प्रकारे देशातील कायदा, लोकशाही, चालत असेल तर काय संविधान आणि काय हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट? असं म्हणत त्यामुळेच पवनराजे हत्याकांडाचा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे, असंही राऊत यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.