Shivsena News : शिवसेनेच्या बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक; आर्थिक मदतीच्या नावाखाली केली जातेय पैशांची मागणी

WhatsApp Hacked News : पोलीस यंत्रणेकडून व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.
eknath shinde, shaina nc
eknath shinde, shaina nc sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात गेल्या काही दिवसापासून सर्वसामान्य नागरिकांचा मोबाईल हॅक करून सायबर हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. त्या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणेकडून केला जात असताना या प्रकाराचा फटका आता सत्ताधारी पक्षातील नेत्यांना देखील बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीकडून संपर्क साधत पैशांची मागणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे (Ekanath shinde) यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटवर सायबर हल्ला करण्यात आला असल्याचा प्रकार समोर आला आहे. या सायबर हॅकरने त्यांच्या संपर्क यादीतील मंडळींना मेसेजेस पाठवून आर्थिक मदतीच्या नावाखाली पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली आहे.

eknath shinde, shaina nc
Ketan Agrawal murder case Beed connection : केतन अगरवाल हत्या प्रकरणात पहिल्यांदाच बीड कनेक्शन : चेतनच्या तोंडून आणखी एका आरोपीचं नाव समोर

शायना एनसी यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती संबंधित सायबर यंत्रणांना दिली आहे. पोलीस यंत्रणेकडून व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनीही अशा सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

eknath shinde, shaina nc
Ketan Agrawal murder case Beed connection : केतन अगरवाल हत्या प्रकरणात पहिल्यांदाच बीड कनेक्शन : चेतनच्या तोंडून आणखी एका आरोपीचं नाव समोर

या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर शायना एनसी यांनी नागरिक, कार्यकर्ते आणि परिचितांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटवरून येणाऱ्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराच्या मागणीवर विश्वास ठेवू नये आणि पैसे पाठवू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

eknath shinde, shaina nc
Ketan Agarwal Murder Case : सिया-चेतनने आधीच केले होते लग्न? संसार सुरु करण्यासाठी होता अडथळा? केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवे वळण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com