Ketan Agrawal murder case Beed connection : केतन अगरवाल हत्या प्रकरणात पहिल्यांदाच बीड कनेक्शन : चेतनच्या तोंडून आणखी एका आरोपीचं नाव समोर

Beed connection in Ketan Agrawal murder case : केतन अगरवाल हत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट समोर आला आहे. तपासादरम्यान बीड कनेक्शनची चर्चा सुरू असताना चेतनच्या जबाबातून आणखी एका आरोपीचे नाव समोर आल्याची माहिती मिळत आहे.
Ketan Agrawal murder case Beed connection : केतन अगरवाल हत्या प्रकरणात पहिल्यांदाच बीड कनेक्शन : चेतनच्या तोंडून आणखी एका आरोपीचं नाव समोर
Sarkarnama
Published on
Updated on

पुण्यातील केतन अगरवाल हत्या प्रकरणाच्या तपासात आता एक नवीन धागा समोर आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनंतर आता आणखी एका तरुणाचे नाव चर्चेत आले असून त्याचा संबंध बीड जिल्ह्याशी असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या हत्याकांडाच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे.

तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, केतन अगरवाल यांच्या हत्येचा कट रचला जात असताना संबंधित तरुणाला त्याबाबत माहिती होती. हा तरुण मुख्य आरोपी चेतन चौधरीचा वर्गमित्र असल्याचे सांगितले जात आहे. तसेच चेतन चौधरी आणि सिया यांनी केतनच्या हत्येच्या नियोजनाबाबत त्याच्यासोबत चर्चा केल्याची माहितीही समोर आली आहे.

Ketan Agrawal murder case Beed connection : केतन अगरवाल हत्या प्रकरणात पहिल्यांदाच बीड कनेक्शन : चेतनच्या तोंडून आणखी एका आरोपीचं नाव समोर
Prashant Kishor News : प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात? नरेंद्र मोदींच्या 'बाॅस'च्या होम ग्राऊंडवर देणार टक्कर...

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी त्या तरुणाला लोहगड येथे येण्याचा आग्रह देखील केला होता. मात्र, 18 जून रोजी तो लोहगडावर गेला नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तो प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित नव्हता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केतन अगरवाल यांचा खून झाल्यानंतर चेतन चौधरी सर्वप्रथम याच मित्राला भेटल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. त्यामुळे या भेटीचे कारण काय होते, त्या वेळी दोघांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली होती आणि या संपूर्ण प्रकरणाची कितपत माहिती त्या तरुणाला होती, याचा शोध आता तपास यंत्रणा घेत आहेत.

Ketan Agrawal murder case Beed connection : केतन अगरवाल हत्या प्रकरणात पहिल्यांदाच बीड कनेक्शन : चेतनच्या तोंडून आणखी एका आरोपीचं नाव समोर
MSRTC Action: ST प्रशासनाने उगारला शिस्तीचा बडगा! नाशिक विभागातील 11 अधिकारी निलंबित

दरम्यान, संबंधित तरुण हा मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. सध्या तो पुण्यातील बालेवाडी परिसरात राहून एका खासगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती मिळत आहे.

या नव्या खुलाशामुळे केतन अगरवाल हत्या प्रकरणातील तपासाची व्याप्ती आणखी वाढली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतला असून त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे. या तरुणाने केतन याचा खून करू नका असे देखील चेतन आणि सिया या दोघांना सांगितल्याची माहिती आहे.

पोलिसांकडून या तरुणाची भूमिका, त्याच्याकडे असलेली माहिती आणि आरोपींशी असलेले संबंध याबाबत सखोल चौकशी सुरू असल्याचे समजते. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com