
New Delhi News : संसदेचे हिवाळी अधिवेशन होत असल्याने दिल्लीतील वातावरण तापले आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आठवडाभरातच दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर आले असल्याने चर्चेला उधाण आले आहे. शिंदे बुधवारी दुपारपासून दिल्लीत असून त्यांनी यावेळी शिवसेनेच्या खासदारांची अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेणार असून त्यासोबतच इतर राज्यातील शिवसेनेच्या नेत्यांची गाठीभेटी घेणार असल्याचे समजते.
त्यातच बुधवारी रात्री उशिरा केंद्रीयमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची गुप्तपणे भेट घेतली असल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे लवकरच सुप्रीम कोर्टाचा शिवसेना पक्ष व चिन्हाबाबतचा निकाल लागणार असल्याने या पार्श्वभूमीवर शिंदे नेतेमंडळीच्या गाठीभेटी घेत आहेत का? याचा काही वेगळा वास येत आहे.
राज्यातील विधिमंडळाचे अधिवेशन पार पडले आहे. मात्र, या अधिवेशनावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना टार्गेट करण्यात आले होते. तर काही मंत्र्यांना इडीकडून नोटिसा आल्या आहेत. त्यामुळे शिंदे यांनी गेल्याच आठवड्यात येऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज्यातील राजकारणाबाबत त्यांची विस्तृतपणे चर्चा झाली होती. त्यानंतरही राज्यातील एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना टार्गेट केले जात असल्याने त्यांनी ही भेट घेतली असण्याची शक्यता आहे.
दिल्लीत या आठवड्यात होणारी सुप्रीम कोर्टातील शिवसेना पक्ष व चिन्हाबाबतची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असली तरी लवकरच निकाल लागण्याची शक्यता असल्याने या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे दिल्लीत भाजपच्या नेतेमंडळीच्या गाठीभेटी घेत असल्याची चर्चा रंगली आहे.
पावसाळी अधिवेशनात दिल्लीत शिवसेना खासदारांसोबत एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे. तसेच देशभरातील राज्य प्रमुखांचीही भेट यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. संसद अधिवेशनकाळात एकनाथ शिंदे हे आपल्या खासदारांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जात असतात. त्याप्रमाणे त्यांचा आजचा हा दिल्ली दौरा असल्याची माहीती देण्यात आली आहे.
शिवसेना खासदारांच्या मतदारसंघात अनेक प्रलंबीत प्रश्न
शिवसेना खासदारांच्या मतदारसंघात अनेक प्रलंबीत प्रश्न आहेत. ते प्रश्न शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे एनडीएच्या वरीष्ठ नेत्यांची भेट घेऊन सोडवणार आहेत. दरम्यान, संसद अधिवेशन काळात एकनाथ शिंदे आपल्या खासदारांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जात असतात. त्याचप्रमाणेच त्यांचा आजचा दिल्ली दौरा देखील असल्याची माहीती देण्यात आल्याचे उदय सामंत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.