Fellowship 2026 : पदवीधरांसाठी सुवर्णसंधी! एक लाखांची फेलोशिप मिळणार, अर्जाची अंतिम तारीख काय?

Sharad Joshi Fellowship 2026 eligibility criteria : पदवीधरांसाठी शरद जोशी फेलोशिप 2026 अंतर्गत 1 लाख रुपयांची फेलोशिप मिळवण्याची संधी. शेती, शेतकऱ्यांचे आर्थिक स्वातंत्र्य आणि ग्रामीण विकासावर संशोधन करण्यासाठी पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि अंतिम तारीख जाणून घ्या.
Fellowship 2026 : पदवीधरांसाठी सुवर्णसंधी! एक लाखांची फेलोशिप मिळणार, अर्जाची अंतिम तारीख काय?
Published on: 
Updated on: 

शेती, शेतकऱ्यांचे आर्थिक स्वातंत्र्य आणि ग्रामीण विकास या विषयांमध्ये रस असणाऱ्यांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. सह्याद्री फार्म्स आणि शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शरद जोशी फेलोशिप 2026’ राबवण्यात येत आहे. या फेलोशिपच्या माध्यमातून शरद जोशी यांच्या शेतीविषयक विचारांचा अभ्यास, संशोधन आणि लेखन करण्याची संधी मिळणार आहे.

निवड झालेल्या उमेदवाराला संशोधनासाठी 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य, तसेच प्रत्यक्ष प्रवासासाठी कमाल 25,000 रुपये मिळू शकतात. या फेलोशिपसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2026 आहे.

शरद जोशी फेलोशिपचा उद्देश काय?

शेतकऱ्यांचे आर्थिक स्वातंत्र्य, शेतीमालाच्या बाजारपेठेतील संधी, महिला शेतकऱ्यांचा निर्णयप्रक्रियेतील सहभाग आणि ग्रामीण अर्थव्यवस्था याविषयी शरद जोशी यांनी मांडलेल्या विचारांचा नव्याने अभ्यास करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यांचे विचार केवळ इतिहासापुरते मर्यादित न ठेवता आजच्या शेतीसमोरील आव्हाने आणि उपलब्ध संधी यांच्या संदर्भात समजून घेण्यावर भर दिला जाणार आहे.

Fellowship 2026 : पदवीधरांसाठी सुवर्णसंधी! एक लाखांची फेलोशिप मिळणार, अर्जाची अंतिम तारीख काय?
Marathwada Drought : दुष्काळाची भीषणता पाहून केंद्रीय पथकही थबकले; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले!

कोण करू शकतो अर्ज?

या फेलोशिपसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जदारांचे वय 25 ते 50 वर्षे असणे आवश्यक आहे. संशोधनाची आवड, स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता, वाचन-लेखनाची सवय आणि प्रस्तावित प्रकल्प पूर्ण करण्याची तयारी या बाबींना निवड प्रक्रियेत महत्त्व दिले जाणार आहे.

1 लाख रुपये आर्थिक सहाय्य; कालावधी किती?

फेलोशिपचा कालावधी साधारण 7 ते 8 महिने असेल. निवड झालेल्या उमेदवाराला संशोधनासाठी 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल. प्रत्यक्ष प्रवासासाठी कमाल 25,000 रुपयांपर्यंतचा खर्च मिळू शकतो. फेलोशिपची रक्कम कामाच्या प्रगतीनुसार वेगवेगळ्या टप्प्यांत वितरित केली जाईल.

कोणत्या विषयांवर संशोधन करता येईल?

शरद जोशी यांच्या पुस्तकांचा अभ्यास, बाजारपेठेचे स्वातंत्र्य, महिला शेतकऱ्यांचे धोरण, शेतकऱ्यांचे आर्थिक स्वातंत्र्य आणि आजच्या तरुण शेतकऱ्यांसाठी त्यांच्या विचारांची उपयुक्तता अशा विषयांवर काम करता येईल. याशिवाय मुलाखतींची व्हिडिओ मालिका, पॉडकास्ट आणि डिजिटल कथन यांसारखे प्रकल्पही तयार करता येतील.

अर्ज कसा करायचा?

इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरून त्याची PDF प्रत sharadjoshi.fellowship@sahyadrifarms.com या ई-मेलवर पाठवावी. आवश्यक पुरावे आणि लेखनाचा नमुना अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. अर्जांची पडताळणी, लेखन व विचारक्षमतेचे मूल्यमापन आणि मुलाखती अशा टप्प्यांतून निवड केली जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com