Sharad Pawar Politics : दिल्लीत बैठक, शरद पवारांचा आजी-माजी खासदारांना कानमंत्र; पक्षविस्तारासाठी...

Sharad Pawar NCPSP : खासदार सुप्रिया सुळे यांनी एक देश निवडणूक, मतदारसंघ पुनर्रचना या संवेदनशील मुद्यांवर पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी व्यापक मंथन व्हावे, अशी सुचना केली.
Sharad Pawar supriya sule
Sharad Pawar supriya sulesarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक दिल्लीमध्ये झाली. या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची संघटना वाढविण्यासाठी प्रमुख नेत्यांचा समावेश असलेली टीम तयार करण्याचे आदेश दिले. पक्षाला भविष्यात मोठी संधी आहे. जय पराजय याचा विचार न करता कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारसरणी कायम राहावे, असे देखील पवारांनी सांगितले.

संसदेत बोलण्याची संधी कमी होत असल्याबाबतही पवारांनी खंत व्यक्त केली. पक्षाची संघटना वाढीसाठी महाराष्ट्रासोबत अन्य राज्यांमध्ये फिरण्यासाठी नेत्यांचे पथक तयार करण्याची सूचना देखील त्यांनी केली.

या बैठकीला पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासह कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे, पो. सो. चाको, महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटोल, जितेंद्र आव्हाड यांच्यासह लोकसभा आणि राज्यसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि सर्व प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते.

Sharad Pawar supriya sule
Namo Shetkari : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये लवकरच खात्यात जमा होणार

खासदार सुप्रिया सुळे यांनी एक देश निवडणूक, मतदारसंघ पुनर्रचना या संवेदनशील मुद्यांवर पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी व्यापक मंथन व्हावे, अशी सुचना केली. तर, कार्यकारिणीच्या बैठकीतून बूथ पातळीवर कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी आजी-माजी आमदार, खासदारांना जबाबदारी सोपवावी, महाराष्ट्रात पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष 40 ते 50 वर्षे वयोगटातील नेमावे, अशा मागण्याही पुढे आल्या.

बैठकीत ठराव

कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सामाजिक व राजकीय विषयावर तसेच देशाच्या विद्यमान आर्थिक स्थितीवर पक्षाची भूमिका मांडणारे ठराव देखील संमत करण्यात आले.राजेश टोपे यांनी ओबीसी समुदायाचे मन जिंकण्याचे प्रयत्न व्हावेत अशी सूचना केली. तर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी महाराष्ट्रात जिल्हाध्यक्ष 40 ते 50 वर्षे वयोगटातील नेमावे अशी सूचना केली.

Sharad Pawar supriya sule
Chandrashekhar Bawankule : पवार, ठाकरे अन् काँग्रेसला सत्तेत कधीपर्यंत वाव नसणार; मंत्री बावनकुळेंनी 'साल' सांगितलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com