Sharad Pawar : शरद पवारांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा धक्का! कुस्तीगीर परिषदेची याचिका फेटाळली

Bombay High Court on Wrestling Council : भारतीय कुस्ती महासंघाने १ जानेवारी २०२३ रोजी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील संघटनेची संलग्नता रद्द केली होती. महासंघाने मूळ संघटनेऐवजी 'महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ' या नव्या गटाला मान्यता दिली होती. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेने न्यायालयात याचिका दाखल केली होती.
Sharad Pawar gets setback from Bombay High Court
Sharad Pawar gets setback from Bombay High CourtSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra State Wrestling Council : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची संलग्नता रद्द करण्याचा घेतलेला निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवत कुस्तीगीर परिषदेची याचिका फेटाळून लावली आहे.

भारतीय कुस्ती महासंघाने १ जानेवारी २०२३ रोजी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील संघटनेची संलग्नता रद्द केली होती. महासंघाने मूळ संघटनेऐवजी 'महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ' या नव्या गटाला मान्यता दिली होती. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेने न्यायालयात याचिका दाखल केली होती.

कुस्ती महासंघाच्या कार्यकारी समितीऐवजी निरीक्षक समितीने हा निर्णय घेतला असून तो पूर्णपणे मनमानी आणि बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने केला होता. मात्र, न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.

Sharad Pawar gets setback from Bombay High Court
Pune Police Corruption : पुण्यात सर्वाधिक लाचखोर पोलीस कुठे? 'एसीबी'ची धक्कादायक आकडेवारी आली समोर...

महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेने न्यायालयात असा युक्तिवाद केला होता की, संघटनेची संलग्नता रद्द करण्याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाच्या कार्यकारी समितीने न घेता निरीक्षण समितीने घेतला होता आणि हा निर्णय मनमानी स्वरूपाचा होता.

नोव्हेंबर २०२२ मध्ये दिलेल्या आदेशात न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी नमूद केले होते की, “भारतीय कुस्ती महासंघाच्या कार्यकारी समितीचा निर्णय हा केवळ नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारा नव्हता, तर संबंधितांना कोणतीही संधी न देता त्यांच्या पाठीमागे घेण्यात आलेला होता. निर्णय घेताना प्रक्रियात्मक न्यायाला पूर्णपणे फाटा देण्यात आला होता.” प्रत्यक्षात शरद पवार यांनी तब्बल ४० वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटनेचे नेतृत्व केले होते.

Sharad Pawar gets setback from Bombay High Court
BMC Commissioner New Car : मुंबई मनपात ‘लक्झरी कार’वर 43 लाखांचा खर्च; आयुक्तांसाठी थेट महिंद्राची इलेक्ट्रिक SUV खरेदीचा प्रस्ताव

मात्र, ४ जुलै २०२२ रोजी भारतीय कुस्ती महासंघाने संघटनेची कार्यकारिणी बरखास्त केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०२२ मध्ये दिलेल्या आदेशात असंही स्पष्ट केलं होतं की, संघटनेची निवडून आलेली कार्यकारिणी तिचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत पदावर राहील आणि संघटनेच्या संविधानानुसार दैनंदिन कामकाज चालवेल.

मात्र, आता शरद पवार अध्यक्ष होते त्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संघटनेची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. याचिकेमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटनेने म्हटले होते की, ३० जून २०२२ रोजी तत्कालीन भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत काही स्पर्धा आयोजित करण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com